
गोंदिया,दि.20ः- सालेकसा पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या लटोरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील ईश्वरदास दोनोडे (वय 44,रा. किकरिपार तालुका – आमगाव,जिल्हा – गोंदिया)याना कंत्राटदाराकडून बिल काढून देण्याच्या नावावर 11 हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 19 जानेवारी रोजी रंगेहाथ पकडले.प्रकरण असे की, तक्रारदार यांनी ग्रामपंचायत लटोरी,पंचायत समिती सालेकसा, जिल्हा गोंदिया येथील 15 व्या वित्त आयोगांतर्गत असलेल्या असाइटोला शाळा रंगरंगोटी करण्याचे 2 लाख रुपयांचे व संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांमधील गाळ काढण्याचे 1 लाख रुपयांचे अशा केलेल्या दोन्ही कामांची बिले मजूर करवून दिले.त्याचा मोबदला म्हणून 12,000 रु. लाच रकमेची मागणी करून तळजोळीअंती 11,000 रु. लाच रकमेची मागणी करून ती लाच रक्कम दिल्याशिवाय तक्रारदाराचे ग्रामपंचायत लटोरी अंतर्गत मनरेगाचा 10 पांदण रस्त्यांचे केलेल्या कामाची बिले सही करून मजुरीकरिता पाठविणार नाही असे सांगून लाच रक्कम 11,000 रु. मागणी केली.त्यानुसार दिनांक 19/01/2023रोजी सापळा कार्यवही दरम्यान आरोपीने तक्रारदाराकडुन ग्रामपंचायत लटोरी येथे ग्रामसेवक कक्षामध्ये लाच रक्कम
11,000 रु. पंचासमक्ष स्वीकारल्याने आरोपीस ताब्यात घेत आमगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे,स.फौ. विजय खोब्रागडे,
पो. हवा. संजय बोहरे, नापोशी संतोष शेंडे,मंगेश काहालकर, संतोष बोपचे ,अशोक कापसे ,चालक दीपक बतबर्वे सर्व ला.प्र.वि. गोंदिया यांनी केली.