घरफोडी करणाऱ्यास अटक, 13 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
24

गोंदिया : पी.पी. कॉलेज रोड, आंबेडकर वार्ड, सिंगलटोली येथील फिर्यादी भाग्यश्री रमन मेश्राम 25 वर्ष ही रात्री दरम्यान घरी झोपली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने दिनांक 14/04/23 चे 23.00 वा. ते 15/04/2023 चे 09.00 वाजता दरम्यान फिर्यादीचे घराचे समोरील दाराचा कडी कोंडा तोडुन एक विवो कंपनीचा जुना वापरता मोबाईल, सोन्याचे टाप्स, चांदीचे पायल,रोख रक्कम 10,000/-रु. असा कि. 25,000/- रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने दि. 15/04/2023 रोजी पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे अप.क्र.235/2023 कलम 457, 380 भादंवि अन्वये अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे पो. ठाणे गोंदिया शहर चे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, यांनी पो. ठाण्यातील गुन्हे प्रकटी करण पथकास याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक, सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पो. ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक चोरी, घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते. गुन्हे प्रकटीकण पथक चोरी, आणि नमूद घरफोडी करणाऱ्या गुन्हेगा रांचा शोध करीत असताना पथकाने प्राप्त विश्वसनिय गुप्त बातमीच्या आधारे संशयीत इसम पवन अशोक पशिने, वय 25 वर्षे, रा. भटेरा चौकी, वार्ड क्रं. 02 बालाघाट, ता. जि. बालाघाट (म.प्र.) यास ताब्यात घेण्यात आले.
ताब्यातील संशयित यास घरफोडी गुन्ह्यातील मुद्देमाल बाबत विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्यांने त्याचा साथी दार नामे- सोहेल खान, रा. बालाघाट (मप्र.)याचेसोबत मिळून चोरी केल्याचे कबुल केले आहे. आरोपी पवन पशिने यांचे जवळुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला एक विवो कंपनीचा मोबाईल किमती 3000/-, सोन्याचे टाप्स 2 नग अंदाजे 3 ग्रॅम कि.अं.10,000/-रु असा एकुण 13,000/- रुपया चा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी दिनांक 24/04/2023 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून आरोपी यांचे कडून गोंदिया शहर हद्दीतील चोरी, घरफोडी चे आणखी गुन्हे उघड होण्या ची शक्यता आहे. यासंबंधा ने सुध्दा गुन्हयाचा सखोल तपास सुरू असून पो हवा. जागेश्वर उईके, पो. ठाणे गोंदिया शहर हे तपास करीत आहेत. सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे निर्देशांन्वये पो. ठाणे गोंदिया शहर चे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटी करण पथक स. पो. नि. श्री. सागर पाटील, पो. हवा. कवलपाल सिंह भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांग डाले, सतिश शेंडे, ओमेश्वर मेश्राम, प्रमोद चव्हाण, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, पुरुषोत्तम देशमुख, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केलेली आहे.