सावंतवाडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार….

0
15

*⬛⬛ओटवणे येथील दोघांना आज पोलिसांनी अटक केली आहे.*

सावंतवाडी :- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी ओटवणे येथील दोघांना आज येथील पोलिसांनी अटक केली आहे. विशाल तिळाजी जाधव (वय २५) व विलास सहदेव जाधव (वय ४९) दोघे (रा.ओटवणे) असे त्यांचे नाव आहे. तर या प्रकरणात आणखी एक आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीचे मागच्या वर्षी अपहरण झाले होते. याबाबतची तक्रार १५ दिवसांपूर्वी त्या मुलीच्या चुलत भावाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. यावेळी ती आढळून आली. चौकशी दरम्यान तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.*

*️️त्यामुळे तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी विशाल याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत विशाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर विलास जाधव याच्यावर अपहरण करून त्याला सहकार्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य एकाच नाव तपासात उघड झाले असून त्याची चौकशी सुरू आहे. आवश्यकता भासल्यास त्याला अटक करण्यात येणार असल्याचे तपासी अमलदार सागर खंडागळे यांनी सांगितले. हा गुन्हा २०२२ मध्ये घडला होता. त्यानंतर संबंधित मुलीचा शोध सुरू होता. ती १६ वर्षाची आहे. याबाबतची तक्रार तिच्या भावाने दिल्यानंतर अधिक तपास करण्यात आला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.