चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या धोपटाला पेट्रोल पंप जवळ रात्री रविवारी ८ वाजता राजुराकडून सास्तिकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने मोटारसायकलने आपल्या पत्नी व मुलीला घेऊन येणाऱ्या निलेश वैद्य (३२ वर्ष) रुपाली वैद्य (२६ वर्ष), मधू वैद्य (३ वर्ष) यांचा जोरदार धडक दिली. या अपघातात एकाच परिवारातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर याच ट्रकने समोर जाऊन प्रज्ञा प्रशाद टगराफ (३३) व प्रसाद राजाबाई टगराफ (४० ) दोन्ही रामपुर येथील यांना धडक दिल्याने दोघेही जखमी आहे.जखमींना चंद्रपूर येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी पाहण्याकरिता गर्दी केली होती. सदर माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून गर्दी नियंत्रणात आणली. प्राप्त माहितीनुसार धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे वास्तव्याने असलेला निलेश वैद्य हा मजुरी करून आपल्या परिवारासह राहत होता. सकाळी आपल्या पत्नी व मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते.