गोंदियात नामांकित कंपन्यांची २२६ बनावट घड्याळे जप्त

0
10

गोंदिया: नामांकित कंपन्यांचे लोगो व स्टिकर्स वापरून बनावट घड्याळ व चष्मे विकणाऱ्या शहरातील कुडवा लाईन व सिंधी कॉलनीत एका दुकानावर २३ नोव्हेबर रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत २२६ बनावट घड्याळे जप्त करण्यात आली.

एसएनजी सॉलिसिटर कंपनी लि. नवी दिल्ली यांचे अधिकृत प्रतिनिधी गौरव तिवारी (३७) यांच्यासह पोलिसांनी कुडवा लाईन येथील ग्रीन वॉच व सिंधी कॉलनीतील न्यू बजाज शॉप या दुकानावर छापा टाकून कारवाई केली. यात ग्रीन वॉच या दुकानातून सोनाटा या नामांकित कंपनीचे बनावट लोगो असलेल्या ११९ घड्याळी, टायटन कंपनीचे बनावटी लोगो व स्टिकर असलेल्या ५६ घड्याळी, फास्ट ट्रक कंपनीच्या ५ बनावटी घड्याळी व फास्ट ट्रॅक कंपनीचे २ बनावटी चश्मे जप्त करण्यात आले. तसेच न्यू बजाज शॉपमधून सोनाटा व टायटन कंपनीचे बनावटी लोगो असलेल्या ४९ घड्याळी व फास्ट ट्रक कंपनीच्या दोन अशा एकूण २२६ बनावटी घड्याळी पोलिसांनी जप्त केल्या.
प्रकरणी आरोपी श्यामलाल मोहनदास बजाज ५४, रा. सुरजमल बगीचा, सिंधी कॉलनी, गोंदिया व आरोपी मोहन प्रितमदास नागदेव २७, रा. सख्खर धर्मशाळेचा मागे माताटोली गोंदिया या दोन्ही दुकानदारांवर कलम ६३, ६५, कॉपीराईट अधिनियम १९५७ सहकलम १०३, १०४, ट्रेड मार्क अक्ट १९९९ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गोंदिया शहर पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे करीत आहेत.