तेराव्यासाठी निघालेल्या वृध्द दाम्पत्याचा अपघात, दोन ठार व एक जखमी

0
19

वर्धा : आज दुपारी बारा वाजता झालेल्या अपघातात माजी प्राचार्य नीलिमा हरिदास पाटील तसेच कार चालक संजय भानुदास गेडाम यांचा मृत्यू झाला. तर माजी जि. प.सदस्य असलेले हरिदास पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाटील कुटुंब हे आपल्या कारने नातलगाच्या तेराव्यासाठी यवतमाळ येथे चालले होते.त्यांच्याच मागे त्यांचा पुतण्या व श्रमिक संघर्ष दैनिकाचे संपादक दिनेश उर्फ चारू पाटील हे दुसऱ्या कारने सोबतच चालले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला. देवळी समोर भिडी येथील दुभाजकावर कार आदळली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. श्रीमती पाटील, ७० या जागीच ठार झाल्या