कुडवा येथे प्रेम सबंधावरून युवकाचा चाकूने खून

0
35

गोंदिया,दि.27ः रामनगर पोलीस ठाणेअंतर्गत येत असलेल्या कुडवा येथे प्रेमसंबधावरुन युवकाचा खून करण्यात आल्याची घटना 27 नोव्हेंबरला रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली.यातील मृतकाचे नाव प्रज्वल मेश्राम वय 20 राह.आंबेडकर वार्ड कुडवा असे आहे.रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपींचा शोध घेत या प्रकरणातील आरोपी संकेत अजय बोरकर वय 20 रा. कन्हारटोली, गोंदिया व आदर्श बाबूलाल भगत वय 21 वर्ष रा.कन्हारटोली या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.फिर्यादी अजित सुनिल गजभिये वय 24 राहणार कुडवा यांच्या तक्रारीनुसार मृतक प्रज्वल अनिल मेश्रामचे आरोपी संकेत अजय बोरकरच्या बहिणीशी प्रेमसंबध होते.आरोपीसोबत मैत्रीही होती.मात्र आरोपीला मृतकाचे आपल्या बहिणीशी प्रेमसंबध असल्याची माहिती नव्हती.फिर्यादीच्या घरी जाऊन आरोपींनी प्रज्वल मेश्राम यास घराबाहेर बोलावून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.आदर्श भगत याने मृतकास पकडून ठेवले व आरोपी संकेत बोरकरने चाकूने वार करून ठार केल्याने पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा नोंद क्र. 362/2023 कलम 302, 34 भा.दं. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील आरोपी संकेत अजय बोरकर वय 20 याचे पाठीवर पाच जखमा असून त्यास उपचाराकरिता जी.एम.सी नागपूर येथे रेफर करण्यात आले.तर आरोपी  आदर्श बाबूलाल भगत वय 21 रा. कन्हारटोली याच्या पायावर घटनेमुळे दुखापत झाली असून त्यावर KTS रुग्णालय येथे उपचार करण्यात आले आहे.सदर आरोपी हा सध्या रामनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात पो . ठाणे रामनगर चे प्रभारी सपोनि-बस्तवाडे,पोउपनि- सोनवणे, श्रेणी पोउपनि- रहमतकर, पो हवा.भगत, राजेश भुरे,चव्हान, कपिल नागपुरे यांनी केलेली आहे.