गौण खनिज तस्करांचा महसूल पथकावर हल्ला,तलाठी गंभीर जखमी

0
14

यवतमाळ,दि.२१- वाढत्या गौण खनिज बद्दल जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना खडसावल्यावर रात्री गौण खनिजाची तस्करी पकडण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर महागाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. महागाव तहसील मधील काळी टेंभी येथे बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडली. तलाठी गणेश मोळगे असे जखमींचे नाव आहे.त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. माती चोरून नेट असल्याची माहिती मिळाल्यावर मंडळ अधिकारी संजय नरवडे तलाठी व त्यांचे पथक काळी टेंभी येथे गेले.रात्रीच्या अंधारात काही जण काही ट्रॅक्टर मध्ये माती भरत असल्याचे आढळून आले.महसूल पथकाने त्यांना त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाव कारवाई सुरु केली असता गौण तस्करी करणाऱ्यांनी महसूल पथकावर हल्ला केला. मंडळाधिकारी संजय नरवडे तलाठी व चालकयाना मारहाण करण्यात आली यात तलाठी गंभीर जखमी झाले असून इतरांना किरकोळ मार बसला आहे.या घटनेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे रात्री उशिरा महागाव पोलिसांनी अज्ञात आरोपींवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात गौण तस्करांनी आपले साम्राज्य निर्माण केले असून रेती तस्करी रोखण्यास महसूल व पोलिस यंत्रणा अपयशी ठरली आहे.