Home गुन्हेवार्ता पशुधन विकास अधिकारी बावनकर लाच घेतांना जाळ्यात

पशुधन विकास अधिकारी बावनकर लाच घेतांना जाळ्यात

0

गोंदिया,दि.19-सालेकसा पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी(विस्तार) सरोजकुमार ग्यानीराम बावनकर(56) व कंत्राटी चालक भुमेश्वर जवाहरलाल चौहाण(33) यांना 4 हजाराची लाच घेतांना लाचलूचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ(दि.18) पकडले.सविस्तर असे की,18 मार्च रोजी तक्रारदाराकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मराठवाडा पॅकेज अंतर्गत शेळीगट अनुदान वाटपमध्ये निवड झाली असून शेळ्यांचा अनुदानाचा पहिला हप्ता 57350 रुपयेचा धनादेश काढण्याकरीता पशुधनविकास अधिकारी यांनी 5 हजाराची मागणी केली.तक्रारदारास लाच द्यायची इच्छा नसल्याने लाप्रविभागाकडे तक्रार नोंदवली.तक्रारीवरुन कारवाई करतांना पशुधन विकास अधिकारी बावनकर यांनी तडजोडीअंती 4 हजार रुपये कंत्राटी वाहनचालक चौहाण यांच्याकडे देण्यास सांगितले.दरम्यान आरोपी क्रमांक 2 वाहन चालक यास लाच घेतांना रंगेहाथ पंचासमक्ष पकडण्यात आले.आरोपीविरुधद् सालेकसा पोलीस ठाणे येथे गु्न्हा दाखल करण्यात आले असून ही कारवाई पोलीस उपअधिक्षक विलास काळे,पोलीस निरिक्षक उमांकात उगले,अतुल तवाडे,सहाय्यक फौजदार संजयकुमार बोहरे,मंगेश कहालकर,संतोश शेंडे,संतोष बोपचे,अशोक कापसे,प्रशांत सोनवणे,संगिता पटले,चालक दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली.

Exit mobile version