Home गुन्हेवार्ता ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या जाळ्यात अडकली ‘ कोल्हापूरात अन्न-औषध’ची महिला अधिकारी

‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या जाळ्यात अडकली ‘ कोल्हापूरात अन्न-औषध’ची महिला अधिकारी

0
कोल्हापूर,दि.२७- एका हॉटेलवर कारवाई टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडील अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती धनाजी देशमुख यांना शुक्रवारी (दि.२६) लाचप्रकरणी पकडण्यात आले. यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.कीर्ती धनाजी देशमुख या सध्या कोल्हापूर येथील विश्व रेसिडेन्सी, ताराबाई पार्क येथे राहतात. त्या मूळच्या समर्थनगर, (मोहोळ, जि. सोलापूर) गावाच्या आहेत.

कीर्ती देशमुख यांच्यावरील कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, त्यांनी हॉटेलच्या तपासणीत आढळलेल्या त्रुटीवरून कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी २५ हजार रुपये लाच घेतल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या कारवाईने अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.पोलिसांनी पंचांसमक्ष देशमुख हिच्या घराची झडती घेतली. त्यात ८० तोळे सोने, रोख साडेतीन लाख रुपये व साडेतीन ते चार जप्त केलेले दागिने. लाख रुपये किमतीचा हिऱ्यांचा हार जप्त करण्यात आला.

कारवाईबाबत विभागाने दिलेली माहिती अशी : यातील फिर्यादीचे किणी (ता. हातकणंगले) येथे हॉटेल आहे. कीर्ती देशमुख हिने १५ मार्च २०२४ ला या हॉटेलची तपासणी करत अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्रुटींबाबत कारवाई न करण्यासाठी देशमुखने फिर्यादीकडे एक लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती ७० हजार ठरले. त्यातील पहिला हप्ता २५ हजार घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले.

कीर्ती देशमुख यांनी धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकात पेसै स्वीकारले. तेथून त्या त्यांच्या वाहनाने घराजवळ गेल्या. तेथील पार्किंगमध्ये वाहन लावत असतानाच लाचलुचपत विभागाने त्यांना ताब्यात घेतले. विभागाला पैशाबाबत मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री करून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले.

या प्रकरणी तिच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्ती देशमुख यांची सात महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पथकाने कारवाईनंतर त्यांच्या मूळ गावी त्यांच्या घराचीही झडती घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे घर बंद होते. त्यांची आई अलीकडेच कोल्हापुरात राहण्यास आल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक बंबरगेकर, भंडारे, सुधीर पाटील, पूनम पाटील यांनी भाग घेतला.

Exit mobile version