Home गुन्हेवार्ता ऑनलाईन’ क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या मोठ्या बुकिंसह १० जणांवर गुन्हा

ऑनलाईन’ क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या मोठ्या बुकिंसह १० जणांवर गुन्हा

0

गडचिरोली : गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात ‘आयपीएल’ क्रिकेटवर राजरोसपणे सुरु असलेल्या ऑनलाईन जुगारावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करीत अहेरी व आलापल्ली येथील १० आरोपीवर गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सद्या ‘आयपीएल’चे सामने सुरु असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ‘मोबाईलअँप’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ सट्टा खेळला जातो. काही मोठे बुकी गावोगावी ‘एजंट’ नेमून त्यांच्यामार्फत हा जुगार चालवतात.
पोलिसांनी ठिठिकाणी छापे टाकून आधी निखिल दुर्गे आणि असिफ शेख याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल व ९ हजार रोख जप्त केले. चौकशीदरम्यान हा जुगार चालवणारे मुख्य बुकी इरफान इकबाल शेख (रा. अहेरी) व संदीप गुडपवार ( रा. आलापल्ली) हे असल्याचे समोर आले.याप्रकरणी वरील चार जणांसह आसिफ फकीर मोहम्मद शेख, धंनजय राजरत्नम गोगीवार, निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार,अक्षय गनमुकलवार,फरमान शेख,फरदिन पठाण असे एकूण दहा आरोपीवर जुगार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित सर्व फरार आहेत. दरम्यान, याप्रकरणी आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपअधिक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केली.

Exit mobile version