गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपी अटक, 12 किलो गांजा जब्त

0
593
गोंदिया,दि.३०: जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजाचा वापर, तस्करी, विक्री करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत प्रभावी दर्जेदार धाडी घालून कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. त्या आदेशाची अमलबजावणी करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २९ जुर्ले रोजी गोंदियाच्या मरारटोली भागात २ लाख ६९ हजार रुपये किमतीच्या १२ किलो गांज्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर असे की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश लबडे यांना  गोपनिय बातमीदाराकडून दोन इसम हे ओडिसा येथून रायपुर मार्गे रेल्वेने गांजाची खेप घेवून गोंदिया मरारटोली भागात येत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार लबडे यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मरारटोली बसस्थानक समोरील मुख्य मार्गावर सापळा रचून २९ जुर्ले रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलने जात असलेल्या संंशयीतांना ताब्यात घेण्यात आले.
त्या मोटारसायकलस्वार दोघांना ताब्यात घेत दोन्हीं बॅगची पंचासमक्ष पाहणी केली असता ताब्यातील निळ्या रंगाच्या ट्रॉली व स्कुल बॅगमध्ये सेलोटेपने गुडाळलेले (वेस्टन असलेले) 12 नग बंडल मिळुन आले. वेस्टन असलेल्या बंडलची पंचासमक्ष खोलून पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर पाने, फुले आणि बिया मिश्रीत एकूण वजनी 12 किलो 160 ग्रॅम, उग्र वास येत असलेला गांजा  किंमती एकूण 2,69,500/- (दोन लक्ष एकोंसत्तर हजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल) मिळून आल्याने जप्त करण्यात आला.तसेच अवैधरित्या विक्रीकरीता गांजाची खेप आणणारे आरोपी ईसम दिनेश विजयकांत मिश्रा, वय 38 रा.काका चौक,सिव्हिल लाइन्स गोंदिया व सोमेश्वर जोशीराम न्यायकरे वय 36 राह. गिरोला,पांढराबोडी ता.जि.गोंदिया यांचेविरूध्द अंमलदार पो.हवा. राजेंद्र मिश्रा, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे रामनगर येथे एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 20, 29 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दोन्ही आरोपीना जप्त मुद्देमालासह रामनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया.गुन्ह्यांचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत.सदरची कारवाई  एलसीबी पोलीस निरीक्षक दिनेश लबडे,रामनगरचे पो.नि. प्रविण बोरकुटे यांचे मार्गदर्शनात पोउपनि वनिता सायकर,पो.हवा.राजू मिश्रा,महेश मेहर,नेवालाल भेलावे,चित्तरंजन कोडापे,भूवनलाल देशमुख,सुजित हलमारे,प्रकाश गायधने,दुर्गेश तिवारी,संतोष केदार, चापोशि घनश्याम कुंभलवार,मपोशि कुमुद येरणे यांनी केली.