
गोंदिया- रावणवाडी पोलिस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कारवाई करीत अवैधरित्या शस्त्र बाळगणार्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली.मिळालेल्या माहितीच्या आधारे रावणवाडी पोलिसांनी तालुक्यातील पोवारीटोला येथे रोहित प्रमोद शहारे (25) याच्या घरी धाड टाकून लोखंडी दांडा असलेला व वेल्डिंग केलेल्या चैन व्हीलचे शस्त्र व चाकूसह ताब्यात घेतले. तसेच मुरपार येथे कारवाई करीत निलेश तेजराम पंधरे (24) याला लोखंडी चाकूसह ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे गोंदिया शहर पोलिसांनी गौतमनगर येथून बादल राजेंद्रकुमार मेश्राम (21) एका लोखंडी चाकूसह ताब्यात घेतले. तिन्ही आरोपीविरुद्ध अवैध शस्त्र बाळगण्याबद्दल कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.