देवरी पोलिसांनी गांजा तस्कराकडून 1 किलो 190 ग्राम गांजा केला जप्त

0
72

देवरी,दि.२३ः देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवरी आमगाव मार्गावरील बोरगांव जंगल परिसरातून गांजा अमली पदार्थांची वाहतूक करीत असलेल्या इसमाला पकडून आरोपीकडून १ किलो १९० ग्रॅम गांजा देवरी पोलिसांनी जप्त केला आहे.त्याची बाजारात १७ हजार ८५० रुपये इतकी किंमत असून विनोद पुरणचंद कन्समारे (४२ वर्षे) रा.सावली ता. देवरी यास ताब्यात घेण्यात आले आहे.
२२ मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षक गोरख भांमरे,अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.आरोपी विनोद कासामारे हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एम.एच.३५ डी.३०१४ने आमगाव ते देवरी रस्त्यावरील मौजा मेहताखेडा गावाकडे जाणाऱ्या मार्गावरुन वाहतूक करताना मिळून आल्याने, आरोपीची झडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातील मोटरसायकलवर लटकविलेल्या पिवळ्या रंगाच्या थैल्यामध्ये १.१९० किलोग्रॅम गांजा अमली पदार्थ किंमत १७ हजार ८५० रुपये व आरोपीच्या ताब्यातील वाहतुकीसाठी वापरलेले मोटार सायकल किंमत ३० हजार रुपये, एक जुना वापरता ओपो कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल अंदाजे किंमत ५ हजार रुपये असा एकूण ५२ हजार ८५० च्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध कलम ८ (क), २० (ब), ११(ब) एन डी पी एस अँक्टस अनन्वे गुन्हा नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार सा. देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी उपनि. माणिकपुरी पो.स्टे. देवरी हे करीत आहेत. सदर कारवाई कामी सपोनी मुकुंद जाधव, श्रेणी उपनि माणिकपुरी, सापो. हवा. करंजेकर,पोना. पटेल, कांदे, चंदनबटवे, पोना. जांगडे पोसी. मेंढे, डोहाळे, यांच्या सहभाग होता.