ट्रकच्या धडकेत अखेर नातवानंतर आजोबाचाही मृत्यू

0
144

चित्रा कापसे/तिरोडा,दि.२८- तालुक्यातील डाकराम सुकळी येथे तेरवीचे जेवण आटोपून स्वगृही खुरखुडी येथे परत जाण्यासाठी नातवासह निघालेले माजी सरपंच राहिलेल्या आजोबाच्या दुचाकीला वाहनाने धडक दिल्याने घटनास्थळीच नातवाचा तर उपचाराकरीता नेतांना आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना आज २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

सदर घटना तिरोडा तुमसर मार्गावरील पांजरा येथील खुरखुडी मार्गे वळण घेत असताना तिरोडा ते तुमसर मार्गे जाणाऱ्या भरधाव ट्रक ने दुचाकीला धडक दिल्यामुळे नातू सारंग येळे वय २०,मु.चिखली घटना स्थळीच मुत्यू पावल्याची दुर्दैवी घटना घडली.दरम्यान अपघातानंतर ट्रक घटना स्थळावरून पसार झाला.

यात माजी सरपंच जुगराज बोपचे वय ६० यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील औषधोपचारासाठी भंडारा येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. झालेल्या अपघाताने खुरखुडी व चिखली गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती तिरोडा पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटना स्थळी पोहचले. सारंग येळे यांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.