भरधाव टे्रलरने तरुणास चिरडले; जागीच मृत्यू

0
32

भंडारा – तालुक्यातील पवनी मार्गावर पालगाव येथे दि.८ जून रोजी दुपारी अडीच वाजतादरम्यान भरधाव ट्रेलरने तरुणास चिरडून ठार केले. अनियंत्रित टे्रलरने विद्युत खांबाला धडक देऊन गावात शिरला. यात ट्रेलर चालक जखमी झाला. सुशांत नंदलाल गणवीर (२८) रा.पालगाव, असे अपघातात मृतक झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक याचे दिड महिन्याअगोदर लग्न झाल्याची माहिती पुढे येत आहे.

कारधा – पवनी मार्गावरील पालगाव येथील सुशांत गणवीर हा (Youth Death) घटनेच्यावेळी गावातील बसस्थानकावर आला होता. पान टपरीतून घराकडे पायदळ जात असतांना त्यादरम्यान कारधा कडून पवनीच्या दिशेने जाणारा ट्रेलर क्र.एमएच ४० सीएम २७८५ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रेलर निष्काळजीपणे चालवून घराकडे पायदळ जात असलेल्या सुशांत या तरुणाला जबर धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित ट्रेलरने महामार्गाच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला धडक देऊन रस्त्याच्या बाजूला अंगणात ठेवलेल्या ट्रॅक्टर साहित्यांवर चढला.

त ट्रॅक्टरच्या रोटावेटरचे तसेच इलेक्ट्रिक खांबाचे नुकसान झाले. तर ट्रेलर चालक जखमी झाला. (Youth Death) अपघात घडताच गावकर्‍यांनी घटनास्थळी तोबा गर्दी केली होती. काही काळ घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अपघाताची माहिती जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी सुशांत याला रुग्णावहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या (Youth Death) अपघातानंतर घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने कारधाचे सफौ अशोक सरोदे, पोहवा कांचन टेंभुर्णे, सुभाष राठोड, पोशि रमेश काळे, अरुण रेवतकर, प्रमोद आरीकर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमी ट्रेलर चालकाला रुग्णालयात पाठविण्यात आले. तर जमावाला समजवून शांत करण्यात आले. सध्या जखमी ट्रेलर चालकावर उपचार सुरु असल्याचे सांगितले जाते. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात सफौ अशोक सरोदे करीत आहेत.