रेती वाहतूक करणारे 8 ट्रॅक्टर जप्त

0
62

गोंदिया-. वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणारे 8 ट्रॅक्टर तिरोडा तालुक्यातील परसवाडा मंडळात बुधवारी (दि. 25) करण्यात आली.
तिरोडा तालुक्यात रेतीच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीचा मुद्दा सध्या रंगू लागला आहे. तहसीलदारांनी त्यासंदर्भात नोटिस बजावले आहे. त्याचबरोबर कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. बुधवारी परसवाडा मंडळात महसूल विभागाचे नायब तहसीलदार ए. पी. मोहनकर, मंडळ अधिकारी राजेश तांबूलकर, तलाठी अजय बिसेन, जे.पी. उईके, बी.के. पारधी यांनी परसवाडा परिसरात धाडसत्र राबविले. दरम्यान वैनगंगा नदीतून उत्खनन करून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे 8 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. त्यात एमएच 35 / जी-6613 क्रमांकाचा ट्रॅक्टर अर्जुनी येथील नदीपात्रातून जप्त करून चालक-मालक शुभम अशोक साकुरे (रा. अर्जुनी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एमएच 12 एआर 7917 क्रमांकाचा ट्रॅक्टर वैनगंगा नदीच्या अर्जुनी घाटातून पकडण्यात आला. चालक-मालक अमित इंदल चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुनीच्याच घाटातून विना क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त करून गौरीशंकर हेमराज राणा (रा. अर्जुनी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विनाक्रमांकाचा डी. एच. पटले याचा ट्रॅक्टर, विशाल रामेश्वर मिश्रा (रा. अर्जुनी) याचा एमएच 35 / एड्ब्लू-3552, एमएच 35 / एएच 1453 चा चालक-मालक महेंद्र ब्रिजलाल राणे, एमएच 35 / एजी-7468 क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा चालक व मालक रामेश्वर देबीलाल रहांगडाले (रा. अर्जुनी) यांच्याविरोधात करण्यात आला.