
गोंदिया,दि.२६- जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोमाटोला बोदा गाव परिसरातील एका फार्महाऊसवर एका महिलेचे जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर घटना २४ जून रोजी सायकांळ ६ वाजेच्या सुमारास घडली असून दवनीवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 266/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 64 (2)(m) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर पीडिता ही लोमेश्वरच्या फार्महाऊसवर काही काळापासून काम करीत होती. काही वर्षांपूर्वी देखील आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी गावातील तंटामुक्त समितीने प्रकरणाचा तडजोडीने निपटारा केला होता. मात्र, आरोपीने त्यानंतर पीडितेचा विश्वास संपादन करत तिच्या नावावर तीन लाख रुपयांचे बँक कर्ज घेतले होते.कर्ज परत न केल्यामुळे पीडिता आपले पैसे मागण्यासाठी लोमेश्वरच्या फार्महाऊसवर गेली होती. त्यावेळी आरोपीने तिचा डावा हात पकडून तिला जमिनीवर पाडले व तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केला.या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्वरीत गुन्हा नोंदवला आहे. तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.