नागपूर,दि.11: नागपूरच्या दिघोरी येथे मध्यरात्री एकाच कुटुंबातील पाचजणांची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी दोन लहान मुलं आणि वृद्धेचाही खून केल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक याची मुलगी ७ वर्षीय मितालीचा अखेरचा आधारही हरविला आहे. चार वर्षापूर्वी बापाने तिच्या आईची हत्या केली होती. त्यामुळे लहान भाऊ व मिताली मामाच्या आसऱ्याने नागपूरला राहत होते. मात्र रविवारच्या मध्यरात्री क्रूरकर्म्याने हा शेवटचा आधारही हिरावून घेतला. आज घटनेनंतर जमलेल्या नातेवाईकांच्या गराड्यात मिताली एकटी पडली होती.
दिघोरीतील आराधना नगरात ही घटना घडली. आराधना नगरात राहणारे कमलाकर पवन
इतक्या निर्दयीपणे कुणी शत्रुलाही मारू नये, अशा विक्षिप्तपणाने त्याने स्वत:च्या बहिणीच्या कुटुंबाचा घात केला. यात त्याने स्वत:च्या पोरालाही संपविले. मिताली मात्र वैष्णवीसोबत वेगळी झोपली असल्याने त्याच्या क्रौर्यापासून बचावली. आधी आईपासून आणि आता मामाच्या आसऱ्यापासून मिताली पोरकी झाली.