Home गुन्हेवार्ता धानला येथील युवकाची आत्महत्या

धानला येथील युवकाची आत्महत्या

0
मौदा,दि.16 – तालुक्यातील धानला येथील शेतकरी घनश्याम रूपचंद पगाळे (वय 35) यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली उघडकीस आली आहे.घनश्यामचे धानला येथील आझाद चौकामध्ये सलूनचे दुकान आहे. घनश्यामची पत्नी काही कालावधीपासून मुंबई महानगर परिसरामध्ये राहत असल्याने तो भेटीकरीता गेला होता.15 जुलैला तो धानला येथे परत आला. रात्रीला मोठ्या भावाकडे जेवण करून स्वतःचे राहते घरी झोपायला गेला. सकाळी मोठ्या भावाने त्याला आवाज दिला असता कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भावाने खिडकीतून डोकावून बघितले असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.लगेच घटनेची माहीती मृतकाचा भाऊ चोखाराम पंगाळे याने मौदा पोलिसांना दिली.घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. मृतकाचे शव उत्तरीय तपासणीकरीता मेयो रूग्णालय नागपूर येथे पाठविण्यात आले.मृतकाच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पोलिस निरिक्षक आशिफ शेख यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार मनोहर जंगवाळ पुढील तपास करीत आहे.

Exit mobile version