Home गुन्हेवार्ता तिल्ली येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

तिल्ली येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

0

गोरेगाव,दि.27ः-तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथे तलावात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना (दि.२५) दुपारी २ वाजता सुमारासची आहे. देवेंद्र लक्ष्मीकांत कोल्हे (१७) असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
तिल्ली मोहगाव येथील देवेंद्र कोल्हे हा नेहमीप्रमाणे २५ जुलै रोजी आंघोळ करण्यासाठी गावालगतच्या परसाडीटोला येथील तलावावर गेला. दरम्यान आंघोळ करतानी आंघोळ करतानी त्याचा पाय घसरून खोल पाण्यात गेला व त्याचा मृत्यू झाला. देवेंद्र हा परत सायंकाळपर्यत घरी परतलाच नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला. परंतु, काहीच थांगपत्ता लागला नाही. दरम्यान तलावाच्या काठावर त्याचे कपडे दिसून आल्याने देवेंद्र हा तलावात बुडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून (दि.२६) सकाळी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेची नोंद घेवून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव रूग्णालयात पाठविले. शोकाकुळ वातावरणात तिल्ली येथील मोक्षधामात देवेंद्रच्या मृतदेहावर अंत्य संस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version