Home गुन्हेवार्ता रेल्वेत होणाऱ्या मोबाईल चोंऱ्यासह दारू तस्करीवर नजर-आशुतोष पांडेय

रेल्वेत होणाऱ्या मोबाईल चोंऱ्यासह दारू तस्करीवर नजर-आशुतोष पांडेय

0

गोंदिया,दि.12 : दक्षिण पुर्व मध्य रेल्वेंतर्गंत गोंदिया हे रेल्वेस्थानक महत्वाचे असल्याने या स्थानकात चोंऱ्यावर आळा घालण्यासाठी टाॅस्कफोर्स गठित करण्यात आले आहे.सोबतच गोंदिया -चंद्रपूर रेल्वेमार्गावर महिलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी केली जात असल्याने रेल्वे गाड्यांमधून होणाऱ्या दारु तस्करीवर आळा घालण्यासाठी कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती दक्षिण पुर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांनी रविवारला(दि.11) पत्रकारांशी बोलतांना दिली.
रेल्वे सुरक्षा बलाचे जवान या दारुच्या तस्करीवर करडी नजर ठेवणार आहे. रेल्वेमधून अवैध वेंडर प्रवास करीत असून त्यांच्यावर कारवाईची मोहीम शिथील झाल्यामुळे याचा त्रास प्रवाशांना होत आहे.सोबतच तृतीयपंथीयाकडून काही प्रमाणात त्रास असून ते आऊटवर रेल्वेगाडीत चढत असल्याचे निदर्शनास आले आहे. छोट्या स्टेशनवरुन ते गाडीत प्रवेश करतात व मोठे स्टेशन येण्याच्या पूर्वीच उतरतात. या प्रकारवर पूर्णपणे आळा घालण्यात येईल असे पांडेय यांनी सांगितले.आत्तापर्यंत 7 लाख 14 हजाराची चोरी उघडकीस आणण्यात आली असून 31 गुन्ह्यात 66 लोंकाना अटक करण्यात आल्याची माहिती दिली.गांजाप्रकरणात 1 लाख 74 हजाराचा माल जप्त करण्यात आले असून दोन दिवसापुर्वी 5 मोबाईल चोरट्यांना पकडण्यात आल्याची माहिती दिली.तसेच प्रवाशांचे साहित्य लंपास करणार्या आरोपीकंडून 58हजार 200 रुपयाचे साहित्य हस्तगत करण्यात आल्याचेही सांगितले.
पत्रकारांनी पार्किंग व्यवस्थेवर विचारले असता गोंदिया रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागातील पार्कीग व्यवस्था बिघडल्याचे मंडळ सुरक्षा आयुक्तांनी मान्य केले.खाजगी व्यक्तींना वाहन ठेवण्याचे कंत्राट दिल्यामुळे त्याच्याकडून वाहन रस्त्यावर ठेवले जात असल्याने प्रवाशांना गाडी पकडता येत नाही.तसेच रेल्वे कॉलोनीत होणाºया चोºया गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले. महिला दिनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या तेजस्वीनी ग्रुपची माहिती मंडळ सुरक्षा आयुक्तांनी दिली. गोंदिया ते नागपूर दरम्यान ३५ महिलांची एक चमू तयार करण्यात आली. या महिलांना महिला मित्र असे नाव देण्यात आले. या महिला गाडीच्या डब्ब्यामध्ये होणाऱ्या असामाजिक घटनावर करडी नजर ठेवून याची माहिती रेल्वे विभागाला देते. त्याच्या सहकार्याने मार्चपासून आतापर्यंत ४०० प्रकरणे दाखल करण्यात आली. यात काही तिकीट निरीक्षक, महिला पोलीस व अपडाऊन करणाºया महिलांचा समावेश असल्याचे म्हणाले.

Exit mobile version