प्रभारी अग्निशमन अधिकाऱ्याला मारहाण,एकमेकांविरुध्द पोलिसात तक्रार

0
157

गोंदिया,दि.06 : नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेमधील वादाला घेऊन पतसंस्थेमध्ये कार्यरत एका कर्मचाऱ्याने संस्था संचालक व प्रभारी अग्निशमन अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना गुरूवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजतादरम्यान घडली.माहितीनुसार येथील नगर परिषद कर्मचारी पतसंस्थेमध्ये लेखापाल पदावर कार्यरत मुकेश नायक व सचिव राजा नायक यांच्यात आपसात वाद असून मुकेश नायक यांनी पतसंस्थेमध्ये यापुर्वीही काही वाद घातला होता व त्यावर त्याला २० फेब्रुवारी रोजी कामावरून कमी करण्यात आले. यावर त्याने गुरूवारी (दि.५) दुपारी पतसंस्थेमधील सर्व कर्मचाºयांना बाहेर काढून  कार्यालयाला कुलूप ठोकले.त्यावर संस्था संचालक व प्रभारी अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले होते.त्यामुळे नायक याने सायंकाळी ७ वाजतादरम्यान अग्निशमन कार्यालयात जाऊन भेंडारकर यांना संचालक पदाचा राजीनामा देण्यास सांगत धक्काबुक्की केली.प्रकरणी मुकेश नायक तसेच भेंडारकर यांनी एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली असून या प्रकरणाला घेऊन आज शुक्रवारी (दि.६) नगर परिषद कार्यालय बंद ठेवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलीस उपनिरिक्षक नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता कारवाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.