फर्निचर मशिन चोरटे रामनगर पोलिसांच्या जाळ्यात

0
156

चंद्रपूर,दि.15:-फनि॔चर तयार करण्यासाठी लागणारी किमतीे मशीन चोरणार्या अट्टल चोरट्यांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मशिन चोरीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी अप क्र.290/2020 कलम , 461,380 भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन शोधमोहीम सुरू केली होती.

शहरातील तुकुम परीसरातील सुरडकर यांचे माट॔ मधून नुकतीच ९ नग फर्निचर तयार करण्याकरीता लागणारे मशिन अज्ञात चोराने चोरुन नेल्याची तक़ारीनुसार रामनगर पोलिसांनी सुरु केलेल्या शोधमोहीमेत अखेर २ अट्टल चोरट्यांना मशिनसह पकडण्यात पथकास यश मिळाले. रामनगर पोलिसांनी अजय बाळाजी फुलबाधे (रा.तुकुम) व साजन गुणवंत मेश्राम(रा.पंचशीलनगर, उर्जानगर) यांना अटक केली असून त्यांचेकडून ८ मशिन्स हस्तगत करण्यात आली आहेत.

सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक हाके यांचे मार्गदर्शनात पो.उ.निरिक्षक संदिप कापडे, सहा.फौजदार जाधव , पो.हवा. गजानन डोईफोडे , ना.पो.शि. जिकाटे , राठोड ,पो.शि माजिद ,जुमनाके, निलेश मुळे या गुन्हे शोध पथकाने चोरीचा छडा लावून मशिन्स चोरीच्या गुन्हयाचीसाखळी शोधली आहे. पुढील चौकशी व कारवाईतून अजून हा संबंधित गुन्हे उघडकीस होणार आहेत.