वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या

0
504

पवनी,दि.18 :येथील वैनगंगा नदीच्या पुलावरुन उडी घेऊन एका इसमाने मंगळवारच्या सायकांळी 4.30 वाजेच्या सुमारास आत्महत्या केली.पोलिसांनी मृत्यूदेह पाण्याबाहेर काढले असून हा इसम कोण अद्याप कळले नाही.उजव्या हातावर “अर्जुन” असे गोदन असून अंगात काळी पॅन्ट व टी शर्ट घातलेली असून टी शर्ट च्या डावीकडे इंग्रजी एच असे लाल अक्षरात प्रिंट आहे. सदर इसम हा अंदाजे 50 वर्ष वयाचा असून या इसमास कोणी ओढखत असल्यास त्यांनी पवनी पोलीस स्टेंशनला कळविण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी केले आहे.