मुलानेच केली वडिलांची हत्या

0
376

आमगाव,दि.21ः- पोलीस स्टेशन अंतर्गत तिगाव येथे 19 वर्षीय मुलांने दारूच्या नशेत स्वतःच्याच वडिलांची हत्या केल्याची घटना आज घडली.मृत व्यक्तीचे नाव रुपलाल धुर्वे (52 वर्ष ) असे आहे.या घटनेची माहिती आमगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.
दारुच्या नशेत मुलाचा वडीलासोबत अनेकदा भांडण व्हायचे पण आज मुलांने उलट्या कुऱ्हाडीने मारले व त्या नंतर सरळ कुऱ्हाडीने मांडी व गळ्याच्या मागच्या भागावर वार केल्यामुळे वडीलाचा जागीच मृत्यू झाला.