अतिरिक्त पोलीस अधिक्षकाच्या पथकाने पकडली दोन लाखाची दारु

पावणेदोनलाखाच्या दारुसह पावणे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त

0
276

गोंदिया,दि.२३ः-अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणेहद्दीतंर्गत येत असलेल्या लाखांदूर मार्गावर एका ट्रक्टरमध्ये देशीदारुची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळताच त्यांनी पथकाला पाचारून करुन सदर ट्रक्टरच्या तपासणीतून सुमारे १ लाख ८२ हजार रुपयाच्या देशीदारुसह सुमारे ८ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २२ मार्च रोजी केली.अति.पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार धुमाळ,पोलीस हवालदार कंगाली,पोलीस नायक राऊत यांना मिळालेल्या माहितीच्याठिकाणी पाठवून अर्जुनी मोरगावकडून लाखांदूर मार्गाकडे येत असलेल्या ट्रक्टरला धाबेटेकडी शिवारात थांबवून तपासणी केली असता ट्रक्टरच्या ट्रालीमध्ये ७० बॉक्स देशी दारु ज्यामध्ये ९० मिलीच्या १०० बाटल्या सुप्रीम नंबर १ लिहिलेले असे ७०० बॉटल किमत १ लाख ८२ हजार रुपये व ट्रक्टर ट्राली किमंत ७ लाख रुपये असा मुद्देमाल ८ लाख ८२ हजाराचा जप्त करुन पांडुरंग श्रीराम परशुरामकर(रा.qपपळगाव लाखांदूर) यास ताब्यात घेण्यात आले आहे.सदर प्रकरणात अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भुते करीत आहेत.