नागपूर दि.24: प्रियकरासमोरच प्रेयसीवर पाच युवकांपैकी तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कुहीतील खैरी भागात उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर १२ तासांच्या आत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सूत्रधारासह पाच नरामधमांना अटक केली. सूत्रधार पंकज विलास कुथे (२२), आकाश गुलाबराव लेंडे (२६), सुनील ऊर्फ सुमीत यशवंत गवळी (२७), सूरज बंडुजी मने (२२) व चंद्रशेखर रवींद्र कडव (१९, सर्व रा. कुही) अशी नराधमांची नावे आहेत. पीडित १९ वर्षीय तरुणी बीएच्या अंतिम वर्षाला शिकते. १६ मार्चला प्रियकराने तिला कुही येथे बोलावले. १७ मार्चला ती बसने कुही येथे गेली. दुपारी २ वाजेच्या सुमारास दोघेही मोटारसायकलने खैरी येथील मंदिरात दर्शनासाठी जायला निघाले. रस्त्यात गाडी बंद पडली. याच वेळी ५ युवक तेथे आले. त्यांनी दोघांकडील मोबाइल हिसकावत प्रियकराला मारहाण केली.
तिघांनी तरुणीला जवळील झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दोन दिवसांपूर्वी तरुणीने तिच्या मैत्रिणीला घटनेची माहिती दिली. मैत्रिणीने तिच्या वडिलांना सांगितले