अर्जुनी-मोर(संतोष रोकडे)दि.25ः- तालुक्यातील चान्ना येथे येथे पोलिसांनी गोंदिया येथील नियंत्रण कक्षाच्या मिळालेल्या संदेशावरुन आज धाड घालून धम्मदीप जयदेव दिरबुडे (वय 36)यास आपल्या घऱी अवैधरित्या मोहफुलाची दारु काढतांना रंगेहाथ पकडले.त्यांच्याविरुद्ध कलम 65 ई मुंबई दारूबंदी कायदा अन्वये कारवाई करुन ताब्यात घेण्यात आले असून कारवाई फिर्यादी पोलीस शिपाई रवींद्र किसनलाल रावराणे यांच्या तक्रारीवरून करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मार्च रोजी नियंत्रण कक्ष गोंदिया येथून चान्ना येथे अवैध दारू विक्री व लोकांची गर्दी जमल्याची माहिती अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यांला मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत भुते, पोलीस शिपाई गावराने व सपोनि हसन रेघीवाले चान्ना/बाकटी बीटमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे धम्मदीप हा आपल्या घरी अवैधरित्या मोहफुलाची हातभट्टी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.खबऱ्याच्या माहितीवरुन आरोपीच्या घरी धाड घातली असता झडती दरम्यान माजघरात एका कोपऱ्यात मातीच्या मडक्यात पाच लिटर मोह फुलाची हातभट्टी दारू किंमत पाचशे रुपयांचा माल व त्याच्या घरासमोरील गल्लीत दोन मातीच्या मडक्यात अंदाजे प्रत्येकी 20 किलो मोहफूल सडवा प्रतिकिलो 100 रुपये प्रमाणे एकूण 40 किलो मोहफुल सडवा पास किंमत ४०००रुपये असा मुद्दमेला मिळून आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.