भंडारा,दि.25: भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील चैतन्य कला कनिष्ठ महाविद्यालय बाम्पेवाडा येथील प्रभारी प्राचार्य व विद्यमान शिक्षक देवानंद मळामे,संस्थेचे सचिव कैलास मळामे,संस्थेचे उपाध्यक्ष रिना कैलास मळामे यांनी संगनमताने शाळेत बनाबवट कर्मचारी दाखवून खोटे दस्तावेज तयार करून विविध बँकांकडून कर्जाची उचल तर शाळेतील वेतणोत्तर अनुदानाची अफरातफर करून फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केले आहे .
साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथे उपदेश बहूउद्देशिय शिक्षण अंतर्गत चैतन्य कला कनिष्ठ महाविद्यालय सत्र २००१पासून कार्यरत आहे. सदर संस्थेत पदाधिकारी म्हणून सचिव कैलाश गोमा मळामे,उपाध्यक्ष रिना कैलास मळामे, कोषाध्यक्ष व विद्यमान शिक्षक देवानंद गोमा मळामे यांनी विद्यालयात एकक्षत्र निर्माण करीत संस्थेत व विद्यालयात अनेक गैर कारभार प्रकाराचा सपाटा लावला.
संस्थेचे सचिव कैलास गोमा मळामे अशोक लिलेंड कंपनी गडेगाव लाखनी येथे कार्यरत आहे . या कंपनीतुन मोठ्या पदावर अधिकारी असून स्वताकडे शाळा असून अनेक रिक्त पद भरण्याचे बनावट खोरी करून बेरोजगारांना फसविण्याचे षड्यंत्र रचून लाखो रुपयांची फसवणूक प्रकरण घडवून आणले. तर
विद्यालयात कर्मचारी नसताना अश्या अनेक वेक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांना कर्मचारी असल्याचे दाखवून त्यांच्या नावाने विविध बॅँक कडून कर्जाची उचल करून फसवणूक केली तर शासनाकडून मिळणारे वेतणोत्तर अनुदान खाजगी वापर करून रकमेची अफरातफर केल्याची बाब समोर आली.
संस्थेचे सचिव कैलाश मळामे,उपाध्यक्ष रिना कैलाश मळामे,कोषाध्यक्ष व विद्यमान शिक्षक देवानंद गोमा मळामे यांनी संगनमत करून माँ वैष्णवी महिला नागरिक सहकारी पत संस्था मर्या. साकोली या बँकेतून मंगेश चुडामन मळामे या वेक्तीला विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून २०१२ ला एक लक्ष पन्नास हजार रुपये कर्ज ,प्रकाश प्रल्हाद थेर याला २०११मध्ये शाळेत ग्रंथपाल पदावर कार्यरत दाखवून एक लक्ष वीस हजार रुपये चे कर्ज , खुशाल शालीकराम चांदेवार याला २०११ ला कायम शिक्षक दाखवून त्यांच्या नावावर एक लक्ष पन्नास हजार रुपये चे कर्ज घेण्यात आले.
भंडारा येथील अशासकीय माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पत संस्थातुन खुशाल शालीकराम चांदेवार याला २०१२ ला कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दाखवून त्यांच्या नावावर एक लक्ष पन्नास हजार रुपये चे कर्ज घेण्यात आले.
प्रकाश प्रल्हाद थेर याला २०१५मध्ये शाळेत कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत दाखवून तीन लक्ष रुपये चे कर्ज उचल केली.
सदर प्रकरणात बनावट कर्मचाऱ्यांची बँकांच्या थकीत कर्जाची वसुली साठी अधिकाऱ्यांनी संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अदयक्ष राजकुमार श्यामकुवर यांना माहिती दिली तर याविषयी अदयक्ष यांनी सविस्तर माहिती घेतल्यावर सदर धक्कादायक प्रकार समोर आले.
याविषयी अदयक्ष यांनी पुढाकार घेत साकोली पोलीस ठाण्यात १४ जून २०२० ला तक्रार दाखल केली. प्रकरणाची चौकशी करून साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्यात पोलिसांनी प्रारंभी चैतन्य कला कनिष्ठ महाविद्यालय बाम्पेवाडा येथील प्रभारी प्राचार्य व विद्यमान शिक्षक यांच्या विरुद्ध भादवी ४२०,४६८,४७१ अंतर्गत प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केले आहे .प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक तेजस सावंत करीत आहेत.
शाळेत बनावट कर्मचारी दाखवून विविध बँकांतून कर्जाची उचल
# बॅँक व संस्थेला लाखांची फसवणूक # पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल #चैतन्य कनिष्ठ महाविद्यालय बाम्पेवाडा येथील प्रकरण