
“धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचा उपक्रम
गोंदिया,दि.30ः- येथील उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाद्वारे एक दिवसीय “ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांची प्रेरणा ” विषयावर मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन २८ मार्च रोजी वेबिनार द्वारे करण्यात आले होते.उदघाटन प्राचार्य डाँ. अंजन नायडू यांनी मुख्य मार्गदर्शक आयआरएस अश्विनकुमार उके आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान उपस्थितीत केले.
उद्घाटकीय भाषणात डाँ. अंजन नायडू यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे वचनबद्धता, कठोर परिश्रम आणि समर्पण असणे आवश्यक आहे. मोठी स्वप्ने बघून विद्यार्थ्यांनी परिश्रम केले तर यशाचे शिखर गाठणे शक्य होते असं ते म्हणाले. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे प्रतिभा संपन्न असतात , परिश्रमी असतात पण मार्गदर्शनाचा अभावामुळे विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येत नाही . म्हणून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात अली असं ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धर्मवीर चौहान यांनी सादर केले. आपल्या प्रास्ताविकात प्रा. धर्मवीर चौहान यांनी उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्देदेश व उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक अश्विनकुमार उके , यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, प्रत्येक विद्यार्थ्यंयांनि सजग व माहितीसंपन्न असलं पाहिजे. त्यांनी सुरुवातीला स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या विविध संस्थांची माहिती दिली. तसेच संघ लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच स्पर्धा परिक्षेच्या स्वरूपात भविष्यात होणार बदल काय आहेत यावर सुद्धा मार्गदर्शन केले.
आपल्या सुरुवाती सत्रात त्यांनी अधिकारी बनण्यापर्यंतचा त्यांचा खडतर प्रवास उपस्थितांना सांगितला तसेच अधिकारी वर्गावर असणाऱ्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात व त्या जबाबदाऱ्या पेलण्या साठी व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे अभ्यासू असणे गरजेचे आहे हे सांगितले. या परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम करण्याची गरज आहे. त्यानी आपल्या मार्गदर्शनात नागरी सेवा परीक्षे वर विस्तृत मार्गदर्शन केले. वाचन करत असतांना कसले वाचन महत्वाचे आहे यावर मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले कि अभयसक्रमाबाहेरील इतर साहित्याचे वाचन हि तेवढेच महत्वाचे आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण ज्ञान वाढते.
या कार्यक्रमाचे संयोजक , उडान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. धर्मवीर चौहान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक यांचा परिचय व आभार प्रदर्शन केले.
हे मार्गदर्शन शिबिर झूम मीटिंग अप्लिकेशन आणि युट्यूब थेट प्रवाहावर घेण्यात आले. या मार्गदर्शन व्याख्यान माले मद्धे २५० विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाँ . अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात प्रा. संजय तिमांडे , डाँ . दिलीप चौधरी व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चौहान आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.