स्वलिखित कविता वाचनमध्ये यश लाडे तालुक्यात प्रथम

0
71

अर्जुनी-मोर-पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिवस सप्ताह साजरा करण्यात आला होता. स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँन्ड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते.त्यात इयत्ता ६वी ते ८ वी विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन स्वलिखित कविता वाचन स्पर्धा घेण्यात आलेली होती.या स्वलिखित कविता वाचन स्पर्धेत, जि. प.वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव शाळेचा इयत्ता ७ वी चा विद्यार्थी यश रोशन लाडे याने अर्जुनी/मोर. तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे, वर्गशिक्षक सु.मो.भैसारे, विषय शिक्षक पुरुषोत्तम गहाणे, प्राची कागणे-ठाकूर, मोहन नाईक, वामन घरतकर, अचला कापगते-झोडे, जितेंद्र ठवकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे, उपाध्यक्ष तानाजी लोदी आदींनी अभिनंदन करुन कौतुक केले.