
गोंदिया,दि.02– बार्टी, सारथी, तारतीकडून अनुक्रमे अनुसूचित जाती, कुणबी, मराठा, आणि अनुसूचित जमाती च्याUPSC पूर्व, मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 50 हजार रुपये तर मुलाखती साठी 25 हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते.मात्र ओबीसी व्हीजेएनटी समुहासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाज्योति संस्थेकडून अद्यापही ओबीसी, एसबीसी,विजेएनटीच्या विद्यार्थ्यांना अशी कुठलीच मदत नाही वा विचारणा सुद्धा नाही की या प्रवर्गातील किती विद्यार्थी UPSC मुलाखतीसाठी पात्र झालेत अशी परिस्थीत राज्यातील आहे.ओबीसी भटक्या जमातीमधील विद्यार्थ्यांना व युवकांना शिक्षणासोबतच इतर संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली महाज्योती संस्था समाजपयोगी उपक्रम राबविण्यात पुर्णतःकुचकामी ठरली असून या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालकाचे पुर्णत डोळेझाक याकडे झालेले आहे.जोपर्यंत या संस्थेचे विद्यमान संचालकांना हटविले जात नाही,तोपर्यंत महाज्योती या ओबीसी व्हीजेएनटीच्या संस्थेतून विद्यार्थ्यांना न्याय मिळणे कठीण असल्याची माहिती ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे यांनी पत्रकातून दिली आहे.
राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या या ओबीसी समाजासाठी ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात आले.मात्र त्या मंत्रालयाचे मुख्य सचिव सुध्दा गैरओबीसी असल्याने योजनांचे क्रियान्वयन केले जात नाही.त्यातच ओबीसी बहुजन कल्याणमंत्र्याचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाल्याचे यावरुन स्पष्ट दिसून येत आहे.बार्टी,सारथी व तारर्थीसारख्या संस्थेतून त्या समाजातील विद्यार्थ्यांना युपीएससीकरीता सर्व सुविधा उपलब्ध करुन दिले जात आहेत.मात्र ओबीसी व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना या सोयी अद्यापही उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत.महाज्योती संस्थेवर नेमलेल्या राजकीय पक्षाच्या गैरसदस्यांचे सुध्या याकडे लक्ष दिसून येत नाही.
बार्टी संस्थेकडून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या UPSC पूर्व परीक्षा- 2020 उत्तीर्ण 122 विद्यार्थ्यांना व सारथी संस्थेकडून कुणबी व मराठा जातीच्या 233 विद्यार्थ्यांना UPSC Mains 2020 Sponsorship योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 50000 रुपये एकरकमी मदत दिली. बार्टी ने 61 लाख रुपये तर सारथी ने 1करोड 16लाख 50 हजार रुपये खर्च केलेत ज्याद्वारे विद्यार्थ्यांनि दिल्लीत मुख्य परीक्षेसाठी योग्य ते प्रशिक्षण घेऊन घवघवीत यश संपादन केले. हीच मागणी ओबीसी, एसबीसी, विजेएनटी विद्यार्थी मागील वर्षांपासून महाज्योती या संस्थेकडे वारंवार करत आहेत.परंतु तेथील प्रशासन निगरगट्ट झाल्यानेच की काय जाणीवपूर्वक ही मदत करण्यास टाळाटाळ करीत आहेत याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे यांनी म्हटले आहे की जोपर्यत महाज्योती संस्थेला पुर्णवेळ ओबीसीव्हीजेएनटी समाजातील अधिकारी मिळणार नाही,तोपर्यंत महाज्योतीच्या योजनांना वाट मोकळी होऊ शकणार नाही.
विशेष म्हणजे पुन्हा बार्टी आणि सारथी संस्थेने UPSC मुख्य परीक्षा पास विद्यार्थ्यांना दिल्लीत मुलाखतीसाठी योग्य ते मार्गदर्शन मिळावे, दिल्लीत मुलाखतीपर्यंत राहता यावे म्हणून पुन्हा 25 हजार रुपये एकरकमी मदत करणार आहे. महाज्योति या संस्थेच्या स्थापनेला आज दीड वर्षे झालीत परंतु योग्य नियोजन आणि दूरदृष्टीचा अभाव असल्याकारणाने UPSC च्या मुलाखती पर्यंत पोहचलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फटका बसत आहे. महाज्योति संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व मंत्री कोरोनाचा कारण समोर करत महत्वाच्या बाबींपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत परंतु याच काळात बार्टी असो वा सारथी यांनी योग्य रीतीने आपली जबाबदारी पार पाडल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे महाज्योतिने लवकरात लवकर UPSC IAS मुख्य परीक्षा पास मुलाखती साठी पात्र ओबीसी,एसबीसी, विजेएनटी विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांची एकरकमी मदत करावी अशी मागणी ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक खेमेंद्र कटरे यांनी केली आहे.