तौक्ते चक्रीवादळामुळे परीक्षा न दिलेल्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ८ जूनपासून

0
18

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे परीक्षा न दिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉमचे पुनर्परीक्षार्थी व व्दितीय वर्ष बीए, बीकॉमचे नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यासाठी पुनर्परीक्षा ८ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

दिनांक १८ मे ते ३१ मे २०२१ दरम्यान आयडॉलच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉमची पुनर्परीक्षा व व्दितीय वर्ष बीए, बीकॉमची नियमित व पुनर्परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेच्या दरम्यान तौक्ते चक्रीवादळामुळे व इतर तांत्रिक कारणामुळे सिधुदुर्ग, रत्नागिरी, पालघरबरोबरच मुंबई, ठाणे, रायगड येथील काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. जे विद्यार्थी वरील परीक्षेस अनुपस्थित राहिले आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पुनर्परीक्षा ८ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. वरील परीक्षेस अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची नवीन लिंक विद्यार्थ्यांच्या ईमेलवर पाठविली जाणार आहे.या पुनर्परीक्षेचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी आयडॉलने पुनर्परीक्षेची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांनी हि पुनर्परीक्षा द्यावी असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ.प्रकाश महानवर यांनी केले आहे.

Re-examination for IDOL students who could not appear for the exam due to Tauktae Cyclone

Mumbai: The re-examination will be conducted online from June 8 for the students for first year B.A. and B.Com and Second year B.A. and B.Com and for the students of the Institute of Distance and Open Learning (IDOL) of the University of Mumbai who could not appear for the examination due to the Tauktae Cyclone.

IDOL’S re-examination for first and second year B.A. and B.Com’s regular and re-examination was completed between 18th May to 31st May 2021. Some students from Sidhudurg, Ratnagiri, Palghar, Mumbai, Thane and Raigad could not appear for the exam and were absent due to Tauktae Cyclone and other technical reasons. Additional re-examination for those students will be conducted online from June 8 onwards. Students who were absent for the above examination will be sent a new link of the examination on the registered email of the students.IDOL’s Director Dr. Prakash Mahanwar would like to inform the students to utilize this opportunity and appear for the re-examination if they were unable to appear for the exam which was held in the month of May due to Tauktae Cyclone.