भंडारा,दि. 19 : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 1 ऑगस्टपर्यंत होती.
परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती याजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन विद्यार्थ्यांनी किंवा एचटीटी
या योजनेच्या अटी, शर्ती व लाभाचे स्वरूप हे विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग शासन निर्णय 11 आक्टोबर, 2018 मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील. अर्जाचा नमूना व सविस्तर माहितीसाठी डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.
विभागातील एकूण 23 विद्यार्थ्यांची निवड
2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता राज्यातून एकूण 75 विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे. या यादीमध्ये नागपूर विभागातील एकूण 23 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील -16 ,भंडारा जिल्ह्यातील -4, गोंदिया जिल्ह्यातील- 1, चंद्रपूर जिल्ह्यातील -2 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. परदेश शिष्यवृत्ती करीता निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन समाजकल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.