एस. सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या – जिल्हाध्यक्ष संजय उके

0
16
**  *कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकारी(माध्य.) यांना निवेदन*
गोंदिया,दि.20ः  विद्यार्थ्यांच्या  प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी १२ जानेवारी  २०२२ ला कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया चे अध्यक्ष संजय उके  यांच्या नेतृत्वात पी.पी. समरीत शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन समरीत यांनी दिले.
     विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांना देय असलेल्या शिष्यवृत्ती मिळत आहेत. एस.सी. (अनुसूचित जाती) प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी तील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. एस.सी. प्रवर्गातील विद्यार्थी हे शिष्यवृत्ती पासून वंचित राहत आहेत. त्यामुळे एस.सी. प्रवर्गातील वंचित सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, प्रलंबित असलेली इतर मागास वर्ग (ओबीसी) विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतरही शिष्यवृत्तीं ची रक्कम तातडीने विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.
    शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, उत्क्रांत उके, राजेश साखरे, शेषराव दहीकर, अजय शहारे, अविनाश गणवीर, व्ही.एम.रोकडे लिपिक, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.