शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट

0
22

सडक अर्जुनी:-(महेंद्र टेंभरे):–जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या, मागण्याना घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति जिल्हा गोंदिया च्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्याशी भेट घेवून विविध प्रलंबित शिक्षक समस्या वर चर्चा करून निवेदन दिले. यावेळी शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे , प्रशासन अधिकारी जनबंधू उपस्थित होते.

*चर्चेत उन्हाची वाढती त्रिव्रता व पाणी टंचाई लक्षात घेवून सकाळ पाळीत*
शाळेबाबत – उन्हाची वाढती तीव्रता व लक्षात घेऊन शाळा सकाळ पाळीत सुरू करणे , वादग्रस्त सडक-अर्जुनी जीपीएफ अपहार प्रकरणांमध्ये शिक्षकांचे अडकलेले ६ व्या वेतन आयोगाच्या थकबाकी चे हफ्ते जमा करणे , न्यायालयीन प्रक्रियेतून आलेल्या शिक्षकांसह सर्व शिक्षकांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या कमाल मर्यादेपर्यंत रुपये पंधराशे नक्षलग्रस्त व 460/-अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करणे . इतर जिल्ह्याप्रमाणे उन्हाळी सुट्टी परिपत्रक काढण्यात यावे व सर्व सुट्या तसेच सकाळ पाळी ची सुरवात बाबत त्याच आदेशात दरवर्षी नमूद करणे , केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षक यांची कार्यशाळा घेऊन पदोन्नती,पदस्थापना देणे,चटोपाध्याय ,वरिष्ठवेतन श्रेणी प्रस्ताव अविलंब निकाली काढून सेवापुस्तिका संबंधित पंचायत समितीला परत करने , वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके त्वरित मंजूर करावे , उच्च शिक्षणाची पूर्वपरवानगी प्रकरणे व कार्योत्तर प्रलंबित प्रकरणे आगामी एक-दोन दिवसात निकाली काढने ,
वरील शिक्षक समस्या ,मागण्या संदर्भाने सविस्तर चर्चा करण्यात आली. व सर्व समस्या लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले.यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप तिडके, सरचिटणीस संदीप मेश्राम, संचालक तथा तालुकाध्यक्ष नीलकंठ बिसेन, दीपक लांजेवार हे उपस्थित होते.