गोंदिया-कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम झाला.त्यामुळे ३0 एप्रिल पयर्ंत पूर्णवेळ शाळा घेण्याचे दर्िेश दिले आहेत. त्यामुळे आता तापत्या उन्हातही शाळा सुरु असून,उन्हाळ्याच्या सुट्टयांबाबत शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शिक्षण संचालनालयाने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसह पुढील सत्रासंदर्भात परिपत्रक काढल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
शैक्षणिक सत्र २0२१-२२ मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरु कण्यास तसेच शाळांची वेळ आणि कामकाजाबाबत शासनाने सूचना दिल्या होत्या. त्यानुसारसकाळी ७ ते दुपारी १.३0 वाजेपयर्ंत शाळा नियमित सुरु आहेत. परंतु उष्णतेच्या लाटेने पारा एकदम वाढल्याने काही जिल्ह्यात शाळांचा कालाधी कमी करण्याची मागणी करण्यात आल्याने शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२.३0 पयर्ंत करण्यात आली. राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्याकरीता २0२२च्या उन्हाळी सुट्टया आगामी २0२२-२३मधील शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्याबाबत शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार २ मे पासून शाळांना सुट्या लागणार असून त्या सुट्यांचा कालावधी १२ जून पयर्ंत असणार आहे. १३ जून पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरु होणार असून विदभार्तील तापमान लक्षात घेता विदभार्तील शाळा २७ जूनपासून सुरु होणार असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकातून कळण्यिात आले आहे.