Home शैक्षणिक भ्रष्ट कुलगुरूंना बडतर्फ करा;विधिसभा सदस्य आक्रमक- राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

भ्रष्ट कुलगुरूंना बडतर्फ करा;विधिसभा सदस्य आक्रमक- राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

0
नागपूर : विद्यापीठ कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी कुलगुरूंची असते. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी या कायद्याची पायमल्ली करीत आहेत. त्यांच्या अवैध, नियमबाह्य, बेकायदेशीर निर्णय व कार्यप्रणालीची चौकशी करून त्यांना तत्काळ बडतर्फ करा, अशा मागणीचे निवेदन बळीराजा पार्टी ने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांना पाठवले आहे.
विधिसभेची बैठक घेण्यासंदर्भात विद्यापीठ कायद्यात स्पष्ट नियमावली आहे. बैठकीत आलेल्या प्रस्तावावर इतरांकडून अनुमोदन आणि चर्चा केली जाते. त्यानंतर निर्णय घेतला जातो. मात्र, कुलगुरूंनीच या नियमांचा भंग केला आहे. त्यांनी कुठलीही चर्चा न घडवून आणता एका मिनिटात प्रस्ताव मान्य करून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ नये म्हणून विधिसभा बरखास्त केली, सदस्यांनी याविरोधात आंदोलन केल्यानंतर कुलगुरूंनी ४ किंवा ५ एप्रिलला बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनाची अद्यापही पूर्तता न झाल्याने सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महत्त्वाच्या विषयापासून पळ काढण्यासाठी कुलगुरूंनी ही खेळी केली. अशा कुलगुरूंना पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी बळीराजा पार्टी चे पश्चिम नागपुर युवा अध्यक्ष, निरज व. फुलझेले यांनी पत्राद्वारे केली आहे.

Exit mobile version