जि.प.सदस्य उषाताई शहारेंचा हस्ते विद्यार्थीनिंना सायकल वितरण

0
40

विनोद सुरसावंत/ककोडी,दि.26. देवरी तालुक्यातील ककोडी येथील जिल्हा परीषद शाळेतील इयत्ता ८ आणि ९ वीच्या २७ विद्यार्थीनिंना जिल्हा परिषद सदस्य उषाताई शहारे यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले.
सन २१/२२ च्या मानव विकास अंतर्गत शाळेच्या मुलींकरिता २७ सायकल जिल्हा परीषद शाळा ककोडीला मंजुर झाले होते.त्या सायकलचे वाटप ककोडी जि.प.सदस्य उषाताई शहारे यांचा हस्ते करण्यात आले. त्यावेळी शाळेचे मुख्यध्यापक मेश्राम,बिआरसी प्रमुख कावळे,पटले,उपसरपंच भैयालाल जाभुळकर,ग्रां.प.सदस्य विनोद सुरसावंत,शाळा समिती रविभाऊ सात्रे, अक्षय ऊकनकर, देवेन्द ऊके पालक आणि गावकरी ऊपस्थित होते.