शुभमचे आयएएस होण्याचे स्वप्न झाले पूर्ण

0
73

गडचिरोली,दि.01ः ठरविलेल्या ध्येयाचा पाठलाग करताना अपयश आले तरी डगमगायचे नाही. ध्येयाचा सातत्याने पाठलाग करीत राहायचे हेच उद्दिष्ट बाळगून शुभम भैसारे मागील ५ वषार्पासून युपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. शुभमच्या पर्शिमाचे अखेर फलित झाले असून सोमवारी (ता.३0) जाहिर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात त्याने ९७ वी रॅक प्राप्त करुन उत्तीर्ण झाला. व आयएएस होण्याचे स्वप्नपूर्ती केली.
शुभम अशोक भैसारे याचा जन्म गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील आरमोरी येथे झाला. त्यांनी सोलापूर येथील लिटील फ्लॉवर कॉन्व्हेंटमध्ये दहावी तर संगमेश्‍वर महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले.
यानंतर त्याने मुंबई येथील सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले. पुढील तयारीसाठी तो दिल्ली येथील आयआयटी येथे दाखल झाला. तेथेच त्यानी आयएएसचा अभ्यास सुरू करून सन २0१७ मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून दिल्ली येथील सीपीडब्ल्यूडी विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून रूजू झाला. त्याने नोकरी सांभाळून युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज ४ ते ५ तास व सुटीच्या दिवशी १२ ते १४ तास तो अभ्यास करीत होता. त्याने युपीएससी परीक्षेत दुसर्?यांदा यश संपादान करत तो रेल्वे वाहतूक सेवेत रूजू झाला. त्यानंतर त्यांनी भारतीय वनसेवा परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतरही त्याने न थांबता आयएएस होण्यासाठी तयारी सुरू ठेवली. अभ्यासातील सातत्याने आणि ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी घेतलेले पर्शिमाचे अखेर फलित झाले. सोमवारी जाहिर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात शुभमने उत्तीर्ण होत ९७ वी रँक प्राप्त करीत आपले ध्येय गाठले. शुभमचे वडील जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावरून सेवानवृत्त झाले असून ते सध्या सोलापूर येथे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर त्याची आई गृहीणी आहे.