नागपूर विभागात गोंदिया अव्वल; जिल्ह्याचा एकूण निकाल ९७.३७ टक्के

0
113

गोंदिया, ता. ८ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. ८) आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या निकालात मुलींनीच बाजी मारली असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी ९८.२२ टक्के इतकी आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९७.३७ टक्के इतका आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा बारावीची परीक्षा आॅफलाइन घेण्यात आली होती. या परीक्षेकरिता १० हजार ११९ मुले, ९ हजार ८७५ मुली अशा एकूण १९ हजार ९९४ मुला-मुलींनी नोंदणी केली होती. १० हजार ६६ मुले, तर ९ हजार ८५३ मुली अशा एकूण १९ हजार ९१९ मुला-मुलींनी परीक्षा दिली. यात ९ हजार ७१८ मुले आणि ९ हजार ६७८ मुली म्हणजेच १९ हजार ३९६ मुले-मुली उत्तीर्ण झाले. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.५४ टक्के इतकी आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९८.२२ टक्के इतकी आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९७.३७ टक्के लागला असून, नागपूर विभागात गोंदिया जिल्हा अव्वल आला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यशाची परंपरा कायम ठेवत यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. जिल्ह्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.
गोंदिया येथील गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचालित मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेचा विद्यार्थी सत्यम शेंडे याने ८८.८३ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. लक्ष्मीनारायण कावरे ८८.१७ टक्के, तर कुणाल रहमतकर याने ८६.३३ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्वच ३८ विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणी प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन, प्राचार्य रूपा मिश्रा, सुभेदार रामगोविंद जगणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे काैतुक केले आहे.
साकेत ज्युनिअर काॅलेज आॅफ सायन्स, गोंदियाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रयास उमाटे याने ९०.८३ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. भाविक नानुरे याने ८८.८३ टक्के, तर कशिश नानकानी याने ८८.६७ टक्के गुण घेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाने दहा वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली. कला व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. साैंदड येथील रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा व आयटीचा शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचे ८१ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच आयटी विषयाचे ३४ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सडक अर्जुनी येथील जिल्हा परिष कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून एकूण ५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच स्व. बनारसीलाल अग्रवाल कनिष्ठ महविद्यालयाचा निकालही शंभर टक्के लागला आहे. डोंगरगाव/ ख. येथील श्री. विक्रमबाबा कला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्राविण्यप्राप्त श्रेणीत १६ विद्यार्थी, प्रथमश्रेणीत २३ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीमध्ये ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
देवरी तालुक्यातील पुराडा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील ५९ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेतील ५९ पैकी १ विद्यार्थी गैरहजर असल्याने परीक्षेला बसलेले ५८ पैकी ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवेगावबांध येथील श्रीमती भा. आ. डोंगरवार कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून आदित्य वामन राऊत ८४.३३ टक्के गुण घेत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. निकीता शत्रुघ्न डोंगरवार हिने ८३.६७ टक्के, तर अभिजित प्रदीप मेश्राम याने ८२.८३ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. कला शाखेतून मनीषा गब्बरसिंग कलचुरी हिने ७८.१७ टक्के गुण घेत महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. हिना अरुण फुंडे हिने ७३.१७ टक्के, तर लिना रतिराम कुंभरे हिने ७३ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. उमाबाई संग्रामे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थिनी दामिनी नाजूकराम लंजे हिने विज्ञान शाखेत ९०.६७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. मृणाल सूर्यभान टेंभुर्णे हिने ७९ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. कला शाखेतून भूपेश सदानंद रोकडे याने ८१.५० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे. वैष्णवी नेमीचंद वलथरे हिने ८०.५० टक्के, तर गायत्री बाळकृष्ण वाढई हिने ७७.८३ टक्के गुण घेऊन अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे.

सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा अमन अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम

अर्जुनी मोरगाव ः येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी अमन रमेशचंद्र अग्रवाल याने ९९ टक्के गुण घेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याला ६०० पैकी ५९४ गुण आहेत. कला शाखेचा विद्यार्थी रेशीम प्रकाश लोगडे याने ८७.१७ टक्के गुण घेत कला शाखेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. विज्ञान शाखेतून एकूण १६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी ९६ विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत, ७० विद्यार्थी प्रथमश्रेणीत व तीन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यासोबतच कला शाखेतून एकूण ६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी १० विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत, ४२ विद्यार्थी प्रथमश्रेणीत व ८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विज्ञान व कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत ९० टक्केच्या वर अकरा विद्यार्थी आले आहेत. यात गुणानुक्रमे पूर्वा टेकराम सावरकर ९३.५० टक्के, सचिन नरेंद्र बिसेन ९३.३३, रोहित सुरेश कापगते ९२.३३ टक्के, गौरव दिनेश चांडक ९१.८३ टक्के, प्राजक्ता अरुण फाये ९१.६७ टक्के, निर्भय विलास कोरे ९१.६७ टक्के, होमी चंदू भुरे ९१.३३ टक्के, शर्वरी प्रमोद निखाडे ९१.१७ टक्के, छबू मोरेश्वर निपाने हिने ९१ टक्के तसेच आशय अनिल चांदेवार याने ९०.१७ टक्के गुण प्राप्त केले आहे. कला शाखेतून अमिषा अरविंद चौधरी हिने ८३.७६ टक्के, दीक्षित कैलाश नंदेश्वर याने ८२.१७ टक्के गुण घेतले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डाॅ. बल्लभदास भुतडा, संस्थासचिव सर्वेश भुतडा व प्राचार्य अनिल मंत्री यांनी त्यांचे काैतुक केले आहे.

पुन्हा एकदा एक्युट पब्लिक शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली

गोंदिया,दि.08ः मागील अनेक वर्षापासून एक्युट पब्लिक शाळेचा निकाल सतत १०० टक्के लागत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात एक्यूट पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत उंचभरारी घेतली.एक्युट पब्लिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेतून वाणिज्य शाखेत कैफ अंसारी या विद्यार्थ्याने ९७.३३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर कुमारी नीलम उईके ह्या विद्यार्थीनीने ७७.५० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच ह्या शाळेच्या विज्ञान शाखेतून ओम कटरे ह्या विद्यार्थ्याने ८९.१७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर गौरव ठकरेले या विद्यार्थ्याने ८७.५० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर प्रणय बावनकर या विद्यार्थ्याने ८५.८३ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच कुमारी नंदिनी वैश्या ह्या विद्यार्थीनीने ८५.६७ टक्के गुण प्राप्त करून चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.राज बिसेन या विद्यार्थ्याने ८५.३३ टक्के गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक प्राप्त केला.           एक्युट पब्लिक शाळेचा शैक्षणिक दर्जा सातत्याने उंचावीत आहे. त्यामुळे विद्यार्थी ही उंचभरारी घेऊन उच्च शिक्षणासाठी झेप घेत आहेत. विशेष म्हणजे या शाळेतून १२ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केले आहे. तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा प्राविण्य यादीत स्थान प्राप्त केले आहे.            विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्रीमती गीताताई भास्कर,सचिव संजयकुमार भास्कर, सहसचिव श्रीमती शुभाताई शहारे तसेच शाळेचे प्राचार्य श्री अमित कुमार ,  मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला पारधी,पर्यवेक्षक श्री प्रविणकुमार मेश्राम ,शिक्षक कुमारी ललिता कुथे, कुमारी रागिणी शाहू व सर्व शिक्षकगन आणि आईवडिलांना दिले आहे.सर्व विद्यार्थ्याना संज्योत बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अशोक लंजे उच्च माध्यमिक आश्रम शाळा सडक अर्जुनी फेब्रुवारी /मार्च :-2022
एकूण निकाल :- १००%
1)कला शाखा निकाल :- १००%
2)विज्ञान शाखा निकाल :- 100%
एकूण डिस्ट्रक्शन विद्यार्थी :- ५
प्रथम श्रेणीतील विद्यार्थी :- 46

सतत दहा वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासणारी एकमेव शाळा आदिवासी विकास उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डों.
स/अर्जुनी– तालुक्यातील जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालीत आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी येथील इ.12 वी कला व विज्ञान शाखेचा निकाल 100% लागलेला आहे.
अर्थात या विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा गत दहा वर्षापासून सतत जोपासलेली आहे ,हे विशेष.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,नागपूर विभाग नागपूर च्या वतिने फेब्रुवारी 2022मध्ये आयोजित इ.12 वी (कला) च्या परीक्षेत 141पैकी 139 विद्यार्थी उतिर्ण, अर्थात निकालाची टक्केवारी 99 व इ.12 वी विज्ञान (माहीती तंत्रज्ञान) च्या परीक्षेत 92 पैकी 92 विद्यार्थी उतिर्ण झालेले असल्यामुळे,निकालाची टक्केवारी 100.
इ.12 वी कला शाखेच्या निकालाचे विश्लेषण
एकूण प्रविष्ट—-141,एकूण उतिर्ण—139,एकूण विशेष प्राविण्य श्रेणीत—-16,एकूण प्रथम श्रेणीत—–88
एकूण द्वितीय श्रेणीत—33,एकूण तृतिय श्रेणीत—-02
इ.12 वी विज्ञान शाखेच्या निकालाचे विश्लेषण
एकूण प्रविष्ट—-92,एकूण उतिर्ण—92,एकूण विशेष प्राविण्य श्रेणीत—-68,एकूण प्रथम श्रेणीत—–24
इ.12 वी माहीती तंत्रज्ञान चा निकाल
एकूण प्रविष्ट—-27,एकूण उतिर्ण—27
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष जे.एस.रहांगडाले,सचिव एन.एन.येळे, उपाध्यक्षा सौ.सी.एन.येळे, सहसचिव सौ.विमलताई रहांगडाले,कोषाध्यक्ष डाॅ.सचिन रहांगडाले,प्राचार्य खुशाल कटरे,पर्यवेक्षक रविशंकर कटरे,उच्च माध्यमिक विभाग प्रमुख वाय.टी.परशुरामकर, उमाशि धनंजय जांभुळकर, कैलास तागडे,सुरज रामटेके, विज्ञान विभाग प्रमुख संजय येळे,उमाशि दिपक मांढरे,कु.सी.बी.टेंभरे,कु.एस.एच.तिरपुडे,एन.ए.पुस्तोडे,पी.आर.उके,सी.बी.पारधी,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी यांनी केले.