कला शाखेत कीर्ती दमाहे तर वाणिज्यमध्ये विशाल ग्वालानी प्रथम
भंडारा,दि.08ः कोरोनाकाळात तब्बल दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे मार्च 2022 मध्ये गृह केंद्रावर घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत भंडारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी बजावत 97.30 टक्केवारी नोंदवून नागपूर विभागात दूसरे स्थान पटकाविले आहे.
विशेष म्हणजे या वर्षीही जिल्ह्यात मुलीच सरस ठरल्या असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 98.19 तर मुलांची 96.46 टक्के आहे.जिल्ह्यातील 88 पेक्षा अधिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शहापूर येथील एसजीबी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनिअर कॉलेजचा अमित व्यवहारे हा जिल्ह्यात विज्ञान शाखेत 95 टक्के गुण घेत पहिला आला आहे. वाणिज्य शाखेत जिजामाता विद्यालयाचा विशाल ग्वालानी तर कला शाखेत नूतन कन्या विद्यालयाची कीर्ती दमाहे ही जिल्ह्यात पहिली आली आहे. भंडारा जिल्ह्यात 17690 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 17627 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांपैकी 17152 विद्यार्थीउत्तीर्ण झाले आहेत. यात 8741 मुले
मुले तर 8411 मुलींचा समावेश आहे. जिल्ह्याचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.79 आहे. जिल्ह्याची विज्ञान
शाखेची टक्केवारी 99.60 असून नागपूर विभागात सर्वोत्कृष्ट आहे. सोबतच व्यावसायिक आणि तांत्रिकी शाखेत 100 टक्के घेऊन जिल्हा नागपूर विभागात प्रथम आहे. जिल्ह्याची कला शाखेची टक्केवारी 94.58 आणि वाणिज्य शाखेची टक्केवारी 97.81 टक्के असून दोन्ही शाखांत जिल्हा नागपूर विभागात द्वितीय स्थानावर आहे.
तालुकानिहाय कामगिरीत साकोली तालुक्याने प्रथम क्रमांक पटकाविला असून साकोली तालुक्याचा निकाल 98.46
टक्के आहे. त्या पाठोपाठ भंडारा तालुका 98.24 टक्के, तुमसर तालुका 97.79 टक्के, लाखनी तालुका 97.73 टक्के, मोहाडी तालुका 97.10 टक्के,लाखांदूर तालुका 95.77 टक्के तर पवनी तालुक्याचा निकाल 94.32 टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण 161 कनिष्ठ महाविद्यालयांपैकी 60 महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. मागील कित्येक वर्षांतील ही मोठी संख्या आहे. भंडारा तालुक्यातील 16, लाखनी 11, तुमसर 11, साकोली 9, पवनी 6, मोहाडी 4 तर लाखांदूर तालुक्यात 3 कनिष्ठ महाविद्यालयांनी 100 टक्के निकाल नोंदविला आहे.
मागील काही वर्षात जिल्ह्यातून विज्ञान शाखेत पहिला येण्याचा मान मुलींकडे गेला होता. मात्र यावेळी शहापूर
येथील एसजीबी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी नमित व्यवहारे याने 95 टक्के गुण मिळवीत जिल्ह्यात पहिला येण्याचा बहुमान पटकाविला आहे. या कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असून संपूर्ण 164 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अकरा विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त झाली आहे. तर ओंकार जाधव, आधार बट्टलवार, तर्ष बारापात्रे,ओंकार कोळी, यश छलोत्रे,अथर्व बर्गे, अथर्व मेंढेकर,सूजल नारनवरे हे विद्यार्थी 90 टक्कांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्यातून पहिला आलेल्या व उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे डिफेन्स सर्विस अकॅडमीचे प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर व डिफेन्स सर्विस ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वंदना लुटे यांनी कौतुक
केले आहे.
विज्ञान शाखेत जिल्ह्यातून दुसरा येण्याचा मान नूतन कन्या महाविद्यालयाच्या चिन्मयी बालपांडे हिने मिळविला
आहे. तिला 93.67 टक्के गुण मिळाले आहेत. कला शाखेत याच शाळेची कीर्ती कुवरलाल दमाहे 86.50 टक्के गुण घेत जिल्ह्यातूनतू प्रथम आली आहे. वाणिज्य शाखेतून भंडारा येथील जिजामाता ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी विशाल ग्वालानी हा 94.83 टक्के गुण घेत पहिला आला आहे.संस्थेचे अध्यक्ष प्रकाश खोकले, सचिव संजय गुप्ते व शिक्षकांनी विशाल चे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नूतन कन्याची तनिषा लक्ष्मण सेलोकर 94.17 टक्के घेत जिल्ह्यातून दुसरी आली आहे. नूतन कन्या महाविद्यालयाच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींचे संस्थेचे कार्यवार्य अॅड भुरे, सहकार्यवाह शेखर बोरसे, प्राचार्या सीमा चित्रीव यांनी गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.