खजरी हायस्कूल ची हौष्णवी 10 वी बोर्ड परीक्षेत अ.जा.प्रवर्गातून सडक अर्जूनी तालुका प्रथम
सडक/अर्जुनी,दि.17 जूनः- म.रा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पूणे अंतर्गत विभागीय बोर्ड नागपूरच्या वतीने, मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या10 वी च्या परीक्षेत खजरी हायस्कुलचा निकाल 99 टक्के लागला आहे. शाळेची हौष्णवी रविंद्र राऊत हिने 92.69% गुण घेऊन संपूर्ण स/अर्जुनी तालुक्यात अ.जा.प्रवर्गातून गुणानुक्रमे व्दितीय क्रमाकं पटकावला.
आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील 186 विद्यार्थी परिक्षेला बसले त्यापैकी 184 विद्यार्थी उतिर्ण झाले.
139 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत,39 विद्यार्थी प्रथम श्रेणीत,06 विद्यार्थी द्वितिय श्रेणीत आले.तर शाळेतून हौष्णवी रविंद्र राऊत(92.60%) व यश दिपक कोटांगले (92.60%) यांनी सयुंक्त प्रथम क्रमांक पटकावला.तणवी दिनेश पारधी(92.40%)व्दितीय,तेजस्वी सोपान मेंढे(91.60%)तृतीय,भूमेश्वरी संतोष परशुरामकर (91%)
,साक्षी कैलास उके(90.80%),गौरी सुदाम झिंगरे(90%),कल्याणी देवेंद्र कोराम (89.80%),विकास खुमराज कोल्हे(89.80%),देवाशिष इंद्रराज राऊत (89.40%)हे गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन जगत कल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगतराम रहांगडाले,सचिव नारायणराव येळे,उपाध्यक्ष सौ.सी.एन.येळे, सहसचिव विमलताई रहांगडाले,कोषाध्यक्ष डाॅ.सचिन रहांगडाले,प्राचार्य खुशाल कटरे ,पर्यवेक्षक आर.के.कटरे, वरिष्ठ शिक्षक डी.डी.रहांगडाले क.महा.प्रभारी वाय.टी.परशुरामकर, ,उच्च माध्यमिक व माध्यमिक, मिडल शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.