गोरेगाव,दि.17ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग 10 वीच्या परीक्षेचा आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात विद्यार्थ्यांनी शाळेची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादित केले आहे.शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण 98 विद्यार्थी परीक्षेला बसले.त्यापैकी 25 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत,49विद्यार्थी प्रथम श्रेणीत,24 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.शाळेतून प्रथम क्रमांक कु.मृणाली हेमंत बिसेन,द्वितीय कु.राशी लिलाधर बिसेन, तृतीय क्रमांक कु.तृप्ती ओमप्रकाश बघेले, व निधी जिवनलाल भगत यांनी पटकावला आहे.सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ टी पी येळे , सचिव एड.टी.बी.कटरे, संचालक यु.टी.बिसेन, मुख्याध्यापक सी.डी.मोरघडे, पर्यवेक्षक वाय.आर.चौधरी व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.