शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची कॅम्पस रिक्रूटमेंटनुसार निवड

0
13

वाशिम, दि. 20  : शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस रिक्रूटमेंटद्वारे निवड करण्यात येणार आहे. ऑनलाईन कॅम्पस रिक्रूटमेंटद्वारे पदविका अंतिम वर्षाच्या पात्र एकूण ६८ विद्यार्थ्यांची देशातील नामांकीत कंपनीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये बजाज ऑटो औरंगाबाद, विप्रो पुणे, टाटा पावर मुंबई, सुझुकी मोटर्स गुरगांव, जॉन डियर पुणे, जनरल इलेक्ट्रिक पावर लिमिटेड व मदरसन ऑटोमोटीव पुणे अशा अग्रगण्य कंपन्यांचा समावेश आहे.

शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे ऑटोमोबाईल, सिव्हील, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अशा एकूण सहा पदविका शाखा असून यामध्ये उद्योगधंद्यांना उपयुक्त असे रोजगारक्षम विद्यार्थी घडवून त्यांना नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. संस्थेचे प्राचार्य व टीपीओ यांच्या प्रयत्नामुळे ऑनलाइन कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पात्र विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. विद्यार्थांची ऑनलाईन परीक्षा घेऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याचे संभाषण कौशल्य, गुणवत्ता व प्रात्यक्षिक कौशल्य यावर आधारित निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मानधन, मेडिक्लेम, ग्रुप एक्सीडेंट पॉलीसी, कॅन्टीन सुविधा देण्यात येणार आहे. निवड झालेल्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

*******