पहिल्या वर्गात दाखल 133 दिव्यांग मुलाचे प्रथमदिनी उत्साहात स्वागत

0
26

गोंदिया,दि.29ः- विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज 29 जून 2022 रोजी शाळां सुरू करण्याचा पहिला दिवस होता.या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी उत्साहात शाळेत हजेरी लावली असून गोंदिया जिल्ह्यात 133 दिव्यांग विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्गात स्वागत करण्यात आले. सर्व शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक पालक गावकरी यांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शाळा प्रवेश दिन घडवून आणत सर्व मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण भारतात नाही तर जगावर कोरोनाच संकट होतं. ते आता सावरलं असून यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात शाळांना सुरुवात झाली आहे.विदर्भात आज 29 जून रोजी सर्व शाळा सुरू करण्यात आलेल्या असुन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्य आदेशाने शालेय प्रवेश शिक्षण मिळावे सह शाळा पूर्वतयारी इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच इयत्ता पहिली मध्ये दाखल विद्यार्थी आहेत त्यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. त्यात गोंदिया जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थी सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झाले यात आमगाव 16, अर्जुनी मोरगाव 8, देवरी, गोंदिया 17, गोरेगांव 33, सडक अर्जुनी 16, सालेकसा 12, तीरोडा 14 असे एकूण 133 विद्यार्थी इयत्ता पहिली दाखल झाले.विद्यार्थ्यांचे आज विभागातील कर्मचारी, वर्गशिक्षक, मुख्याध्यापक यांच्या मार्फत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांना यावेळी मोफत पाठ्यपुस्तक गणवेश इत्यादी देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा दहेगाव तालुका आमगाव येथे जिल्हा परिषद त्या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत वट्टी,पंचायत समिती सदस्य सुनंदाताई उके,जिल्हा समन्वयक विजय ठोकणे, रिसोर्स टीचर आम्रपाली ऊके,सरपंच, पोलीस पाटील आदींनी शाळेत दाखल दिव्यांग मुलाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

रापेवाड़ा : गोंदिया तालुक्यातील ग्राम रापेवाड़ा स्थित जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा रापेवाड़ा येथे पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच गणवेश आणि पुस्तके सुद्धा वाटप करण्यात आली. यावेळी केंद्र प्रमुख गोटेफोड़े सर, शाळा व्यवस्थापण समिति अध्यक्ष अजय कुमार रहाँगडाले, गावातील सरपंच जीवन चव्हाण, उपसरपंच पेमेंद्र तुरकर, मुख्याधपक विलास मड़ावी सर, हटवार सर, सुलाखे सर ठाकुर सर, नरुले मैडम, साठवणे मैडम आंगनवाडी सेविका शोभा ताई ठाकुर, योगेश्वर रहाँगडाले, श्याम बोपचे तसेच सर्व पालकगण या सर्वांच्या उपस्थितीत मेळा वा पार पड़ला।