गोंदिया बायपास रस्त्यावर शाळेची बस पलटली विद्यार्थी सुरक्षित

0
165

गोंदिया,दि.२०::येथील रिंगरोड बायपास रस्त्यावर आज शनिवारला विवेक मंदिर शाळेतील विद्यार्थी सोडणारी मिनी बस पलटल्याची घटना घडली असून विद्यार्थी सुरक्षित आहेत.यात चालक मात्र जखमी झाला आहे़. त्याला उपचारा करिता रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताबद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार, शाळेत मुलांना साेडायला जातांना बसचा वेग अधिक असल्याने रिंगरोडवरील उड्डाणपुलाजवळ चालकाचे नियंत्रण बसवरुन सुटले  त्यातच स्टेअरिंग लाॅक झाल्याने पुलावरुन 15 फुट खाली काेसळली. या अपघातात केवळ चालक जखमी झाला, सुदैवाने विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.रामनगर,न्युलक्ष्मीनगर,रेलटोरी या भागातील 11 मुलांना शाळेत घेऊन ही खासगी बस विवेक मंदीर शाळेत चालली होती.मिनीबस कोसळताचा बसमधील विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्याने रस्त्यालगत असलेले लोक धावत जाऊन त्यांची मदत केली.यामध्ये 3 विद्यार्थ्यांना थोडी जखम झाली असून इतरांना किरकोळ  मार लागलेला आहे.पालकांनी ही खासगी मिनीबस मुलांना सोडण्यासाठी लावलेली होती.