
विद्यार्थ्यांची नागपूर नंतर गोंदियाला पसंती
प्रवेश प्रक्रिया सुरूच, अन्य फेरी बाकी
गोंदिया : तंत्र शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहता आतापर्यंत नागपूर शासकीय तंत्रनिकेतन संस्थेला विद्यार्थ्यांची पहिली पसंती होती. मात्र सन २०२२-२३ या वर्षात नागपूर सोबतच शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाला विद्यार्थी पसंती देत असून यावर्षी आतापर्यंत सर्व विद्याशाखेत ५० टक्क्यांवर प्रवेश झाले आहेत. हा आकडा सन २०२१-२२ मध्ये केवळ २५ टक्के एवढा होता. तंत्रनिकेतन प्रवेशासाठी विद्यार्थी नागपूर नंतर गोंदिया शासकीय तंत्रनिकेतन संस्थेला पसंती देत आहेत.
प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया मध्ये एकूण ३ फेरी ऑनलाईन होतात आणि चौथी फेरी संस्था स्थरावर असते. सन २०२२-२३ च्या पॉलिटेक्निक प्रवेश मधील प्रथम फेरीचे वाटप झालेले असून विद्यार्थ्यांनी प्रवेशसुद्धा घेतले आहे. नागपूर विभागात पॉलीटेकनिक प्रवेशासाठी शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर ही स्वायत्त संस्था आल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्य या संस्थेला असते. सन २०२२-२३ च्या प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत असे दिसून आले की, या वर्षी नागपूर विभागात शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर नंतर शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाला विद्यार्थी व पालकांची प्रथम पसंती आहे.
शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथे ६ विद्याशाखा करिता एकूण ३६० विध्यार्थी प्रवेश क्षमता आहे. एकूण प्रवेश क्षमतेच्या ७० टक्के जागा गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता व ३० टक्के जागा हे इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता राखीव असतात. मागील वर्षी २०२१-२२ ला प्रथम वर्ष पॉलीटेकनिक प्रवेश प्रक्रीयाच्याच्या पहिल्या फेरीत एकूण जागाच्या २५ टक्के प्रवेश झाले होते. २०२२-२३ ला पहिल्या फेरीत हा आकडा दुप्पट होऊन जवळपास ५० टक्क्यांपर्यंत गेला आहे. यावरून असे निदर्शनास येते की, शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पहली पसंत ठरत आहे. प्रथम फेरी मध्ये विशेष करून गोंदिया जिल्हा तसेच बाहेरील विद्यार्थी असे एकूण ३२५ विध्यार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया वाटप करण्यात आले. यापैकी १७३ विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे यावेळेस संस्थेची पूर्णच ३६० प्रवेश क्षमता दुसऱ्या फेरी मध्येच पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे.
शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया मधील प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशाच्या संदर्भात पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्या बाबत संस्थेच्या प्राचार्य सी. डी. गोळघाटे यांना विचारले असता त्यांनी खालील बाबी नमूद केल्या.
- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई तर्फे संस्थेच्या १०० टक्के विभागांना अतिउत्कृष्ट मानांकन असलेली गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे.
- प्लेसमेंटची संख्या सातत्याने वाढत असून,मागील वर्षी १३० विद्यार्थ्यांना विविध जागतिक कंपनी मध्ये रोजगार प्राप्त झाला.
- शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथील सर्व विभाग अद्ययावत साहित्याने सुसज्ज आहेत.
•येथील प्राध्यापक वर्ग उच्च विद्याविभूषित व अनुभवी असल्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे.
संस्थेच्या या प्रगतीबाबत व विद्यार्थ्यांच्या मिळत असलेच्या पसंती बाबत प्राचार्यांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यात संस्थेला स्वायत्तता मिळण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेणे करून रोजगाराभिमुख व जागतिक तंत्रज्ञानाशी सुसंगत तंत्र शिक्षण गोंदिया जिल्हयातील विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होईल.