जत / दि ९ प्रतिनिधी
जत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पांडोझरी गावातील बाबरवस्ती शाळेतील दिलीप वाघमारे यांना नुकताच २०२२ चा सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. त्या बद्दल जत पंचायत समिती व सर्व शिक्षक संघटना मार्फत दिलीप वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
.
यावेळी गट विकास अधिकारी दिनकर खरात म्हणाले, दिलीप वाघमारे हे शैक्षणिक क्षेत्रात सतत काही तरी नवीन प्रयोग करण्याची त्यांची कार्यकुशलता तालुक्याचे नावलौकिक करणारे,जत तालुक्यातील शैक्षणिक,सांस्कृतिक, क्रीडा नवोपक्रम सर्जनशीलता शैक्षणिक क्षेत्रातील नेहमीच अव्वल असणारे असेही व्यक्तिमत्व…. खऱ्या अर्थाने ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान केल्यामुळे एका खऱ्या आदर्श शिक्षकांचा सन्मान झाला .
तसेच गट शिक्षण अधिकारी रतिलाल साळुंखे म्हणाले दिलीप वाघमारे यांनी जिल्हा परिषद शाळेतून गुणवत्ता वाढ व पर्यावरण, व्यसनमुक्ती पूरक उपक्रम राबवून आदर्श ठसा उमटवला आहे.दिलीप वाघमारे सत्काराला उत्तर देताना म्हणाले मला माझ्या कष्टाचे फळ मिळाले. हा पुरस्कार मी माझे विद्यार्थी व पालक यांना समर्पित करतो. संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शिक्षण विभागाला धन्यवाद देतो.या कार्यक्रमास विनायकराव शिंदे, जगन्नाथ वायदंडे,राजाराम सावंत , संतोष काटे,रामराव मोहिते ,दिलीप पवार, संभाजी जगताप ,दिंगबर सावंत,सुनिल सुर्यवंशी,भारत क्षिरसागर,आपले मनोगत व्यक्त केले.
जत पंचायत समिती शिक्षण विभाग व शिक्षक संघटनांच्या मार्फत दिलीप वाघमारे व प्रोत्साहनपर आप्पासाहेब सौदागर , राजू आटपाडकर यांचा सत्कार सोहळा गटविकास अधिकारी दिनकर खरात, गटशिक्षण अधिकारी रतीलाल साळुंखे, व संघटना मार्फत सत्कार करण्यात आला.
संघटनेच्या मागणीवरून.जत पंचायत समिती मार्फततालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याचे गट शिक्षण अधिकारी यांनी केले जाहीर
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी गवारी, अन्सार शेख, सरनाईक सर, शिक्षक बँकेचे विद्यमान अध्यक्ष विनायकराव शिंदे, संचालक फत्तू नदाफ ,वरिष्ठ मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष जगन्नाथ वायदंडे,राजाराम सावंत ,आर. आर.सावंत,उद्धव शिंदे , सुरेश पाटील ,दयानंद मोरे संतोष काटे,रामराव मोहिते ,दिलीप पवार, उत्तम चाबरे, संभाजी जगताप ,दिंगबर सावंत,सुनिल सुर्यवंशी,बोराडे सर,संभाजी कोडाग, भारत क्षिरसागर, विशाल चिपडे,आसंगीतुर्क केंद्रातील केंद्र प्रमुख रामचंद्र राठोड व रमेश राठोड सर्व केंद्रप्रमुख, वरिष्ठ मुख्याध्यापक,मुख्याध्यापक, ग्रामसेवक व सरपंच या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रास्ताविक अन्सार शेख यांनी केले. आभार तानाजी गवारी यांनी मानले.